"पंचब्रह्म उपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदीय परंपरेतील आहे. यात एकूण ४१ मंत्र आहे...
(काही फरक नाही)

१४:३६, १० एप्रिल २०२० ची आवृत्ती

हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदीय परंपरेतील आहे. यात एकूण ४१ मंत्र आहेत. याचा शुभारंभ शाकलाने पैप्पलादास विचारलेल्या एका प्रश्नाने झालेला आहे. तो प्रश्न आहे - सर्वप्रथम सृष्टीप्रारंभाच्या वेळी काय उत्पन्न झाले? आधी पैप्पलादाने क्रमशः सद्योजात, अघोर, वामदेव, तत्पुरुष आणि ईशान उत्पन्न झाल्याची गोष्ट सांगितली आहे; नंतर क्रमाशः त्यांचे स्वरूपवर्णन केलेले आहे. यांनाच ‘पंचब्रह्म’ अशी संज्ञा दिलेली आहे आणि सांगितलेले आहे की ह्या पंचब्रह्म स्वरूपास आपल्या आत्म्यात प्रस्थापित करून ‘मीच पंचब्रह्म आहे’ याप्रकारे आनुभविक ज्ञान प्राप्त करून घेणारा साधक ब्रह्मामृताचे रसास्वादन करून मुक्ती मिळवितो. शेवटी ह्या पंचब्रह्मात्मक विद्येची श्रेष्ठता वर्णन करून हृदयकमलात विद्यमान सदाशिव तत्त्वाच्या अनुसंधानाचा निर्देश दिलेला आहे.