"राधानगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१८९ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
No edit summary
'''राधानगरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[राधानगरी तालुका|राधानगरी तालुक्याचे]] मुख्य गाव आहे. [[दाजीपूर अभयारण्य]] येथून जवळ आहे.राधानगरी  हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले की जे भारतातील एकमेव धरण आहे ज्याला सात स्वयंचलित दरवाजे आहेत.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपोआप स्वयंचलित दरवाजे उचलले जातात व ज्यादाचे पाणी सांडव्यावरून निघून जाते त्यामुळे धरणाला काही धोका पोहचत नाही.राधानगरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे त्यामुळे सर्व महत्त्वाची कार्यालये येथेच पहावयास मिळतात.राधानगरी हे एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले गाव आहे.याशिवाय राधानगरी तालुक्यामध्ये मध्ये काळम्मावाडी २९ टी.एम.सी. आणि तुलसी (धामोड) ३ टी.एम.सी. यासारखी दोन धरणे बांधली आहेत.त्यातील काळम्मावाडी धरणाच्या बाजूला सहवीज प्रकल्प आहे.
धामोड - कोल्हापूर-राधानगरी राज्य महामार्गावर आमजाई व्हरवडेपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असणारी निसर्गसंपन्न धामोड गावच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई, येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
 
 
राधानगरी तालुक्या,च्या पश्चिृम परिसरातील निसर्गसंपन्न हे गाव आहे. या गावापासून जवळच तुळशी नदी आहे. गगनबावडा येथे जाणारा पर्यटक याच मार्गाने जातो.
 
लक्ष वेधून घेणारा सनसेट
गावात बारमाही पर्यटन होते. तुळशी जलाशय सनसेट, ज्योतिर्लिंग मंदिर, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर, बगीचा, ऐतिहासिक किलचा येथील केंद्रबिंदू आहे. तसेच कोते येथे प्राचीन पांडवकालीन मंदिरे आहेत. तुळशी जलाशयावर पर्यटकांचे सतत रेलचेल असते. नीरव शांत निसर्गसंपन्न अशा या तुळशी जलाशयावर जिल्ह्यातून पर्यटक येतात.
 
 
[[वर्ग:राधानगरी तालुका]]
१०४

संपादने