"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६७:
''मुख्य पान: [[मौर्य साम्राज्य]]''
 
अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. [[चंद्रगुप्त मौर्य]]ने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार बिन्दुसारच्या काळात चालू राहिला व [[सम्राट अशोक]]च्या काळात (इसपूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगणिस्तान, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धात]] अशोकने कलिंग देश मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने [[बौद्ध धर्म]]ाचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. [[पाटलीपुत्र]] ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर [[विदीशा]], [[उज्जैन]], [[तक्षशिला]] ही प्रमुख शहरे होती. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील [[अशोकस्तंभ]] आज आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती [[पुष्यमित्र शुंग]] याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा मोठा उत्कर्ष झाला सम्राट अशोक आणि ठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि कारले तसेच नाशिक व अजिंठा-वेरूळ येथील ठिकाणांच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसून येते गुप्तकाळात भारतीय मूर्ती कलेचा मोठा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला महाबलीपुरम ची मंदिरे त्याची साक्ष देणारी आहेत पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली होती दिल्लीजवळ नेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लो स्तंभाच्या आधारित प्राचीन भारतीयांचे धातू शास्त्राचे ज्ञान हे किती प्रगत होते हे समजते प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होते भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम हेदेखील यावरून लक्षात घेण्यासारखे आहे
 
=== शुंग, शक आणि सातवाहन ===