"रेडिओ खगोलशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Reverted to revision 1699612 by निनावी on 2019-08-22T09:37:02Z)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
== इतिहास ==
१९३० मध्ये कार्ल जान्स्कीने अनपेक्षितपणे पहिल्या खगोलीय रेडिओ स्रोताचा शोध लावला. बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये एक अभियंता म्हणून तो अटलांटिक पलीकडच्या आवाजाच्या प्रक्षेपणात अडथळा आणणाऱ्या गोष्टीचा तपास करत होता. एक मोठा दिशादर्शक अँटेनाॲंटेना वापरताना त्याच्या लक्षात आले, की त्याची ॲनालॉग रेकॉर्डिंग प्रणाली अज्ञात स्रोतापासून वारंवार येणारे संदेश रेकॉर्ड करत होती. हे संदेश जवळपास २४ तास आवर्ती असल्याचे दिसून आल्याने ते [[सूर्य]] त्याच्या दिशादर्शक अँटेनाच्याॲंटेनाच्या दृश्यासमोरून जाताना होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्याने काढला. पुढील तपशीलवार निरीक्षणांवरून असे लक्षात आले, की ते संदेश सूर्याप्रमाणे दर २४ तासांनी नाही तर २३ तास आणि ५६ मिनिटांनी पुन्हापुन्हा येत होते. जान्स्कीने या घटनेविषयी त्याचा मित्र, खगोलशास्त्रज्ञ आणि शिक्षक अल्बर्ट मेल्व्हिन स्केलेट याच्याशी चर्चा केली. त्याने जान्स्कीच्या निदर्शनास आणून दिले, की या संदेशांची [[वारंवारता]] सौर दिवसाच्या कालावधीशी तंतोतंत जुळते.<ref नाव="bookrags.com">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.bookrags.com/biography/karl-jansky-wsd/ | शीर्षक = World of Scientific Discovery on Karl Jansky |ॲक्सेसदिनांक = ३१-१२-२०१५ | भाषा = इंग्रजी}}</ref> सौर दिवसाचा कालावधी हा २३ तास आणि ५६ मिनिटे आहे. जेव्हा एखादा खगोलीय स्रोत अकाशातील इतर ताऱ्यांच्या तुलनेत स्थिर असतो व तो पृथ्वीच्या एका परिवलनामध्ये एकदा दिसतो. पुढे या निरीक्षणांची दृश्य [[वर्णपट| वर्णपटलातील]] निरीक्षणांशी तुलना करून जान्स्कीच्या असे लक्षात आले की जेव्हा [[आकाशगंगा|आकाशगंगेतील]] सर्वात जास्त घनतेच्या मध्यवर्ती भागातील [[धनू (तारकासमूह)|धनू तारकासमूह]] त्याच्या अँटेनाच्याॲंटेनाच्या दृश्यासमोरून जाते, तेव्हा हे संदेश तीव्र होतात. <ref>{{जर्नल स्रोत | doi = 10.1038/132066a0 | author = Jansky, Karl G. | शीर्षक = Radio waves from outside the solar system | journal = Nature | volume = 132 | issue = 3323 | pages = 66 | date = 1933 | bibcode = 1933Natur.132...66J | language = इंग्रजी}}</ref>
 
जान्स्कीने त्याचे काम १९३३ साली प्रसिद्ध केले. त्याला या रेडिओ संदेशांचे आणखी संशोधन करायची इच्छा होती, परंतु बेल लॅबॉरेटरीने त्याला दुसऱ्या प्रकल्पावर काम करायला सांगितल्याने त्याने या क्षेत्रात पुढे काम केले नाही. रेडिओ खगोलशास्त्रातील त्याच्या या आद्य प्रयत्‍नांमुळे स्राव घनतेच्या (flux density) मूलभूत एककाला त्याच्या नावावरून जान्स्की असे नाव देण्यात आले.
 
जान्स्कीच्या संशोधनापासून प्रेरणा घेऊन ग्रोटे रेबर याने १९३७ साली त्याच्या घराच्या अंगणात ९ मीटर व्यासाची पॅराबोलिक आकाराची दुर्बिण बनवली. त्याने प्रथम जान्स्कीची निरीक्षणे पुन्हा घेऊन सुरुवात केली व पुढे जगातील पहिले आकाशाचे रेडिओ वर्णपटामध्ये सर्वेक्षण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.nrao.edu/whatisra/hist_reber.shtml | शीर्षक = ग्रोटे रेबर | भाषा = इंग्रजी |अवतरण= जेव्हा आपल्या मंदाकिनी दीर्घिकेतील सर्वात जास्त घनतेच्या मध्यवर्ती भागातील धनु नक्षत्र त्याच्या अँटेनाच्याॲंटेनाच्या दृश्यासमोरून जात होते.ॲक्सेसदिनांक = ३१-१२-२०१५}}</ref> २७ फेब्रुवारी १९४२ मध्ये ब्रिटिश सैन्यातील जे. एस. हे या संशोधन अधिकार्‍याने सूर्याने उत्सर्जित केलेल्या रेडिओ लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा शोधले.<ref>{{स्रोत पुस्तक | लेखक = जे. एस. हे | शीर्षक = रेडिओ विश्व (The Radio Universe) | भाषा = इंग्रजी | आवृत्ती = दुसरी आवृत्ती | प्रकाशक = Pergamon Press | वर्ष = १९७५ | दुवा = https://archive.org/details/TheRadioUniverse}}</ref>
 
पुढे लवकरच अनेक प्रकारच्या स्रोतांची निरीक्षणे रेडिओ तरंगलांबीमध्ये होऊ लागली आणि रेडिओ इंटरफेरोमेट्री, छिद्र संश्लेषण (aperture synthesis) सारख्या तंत्रज्ञानांचा शोध लागला.
६३,६६५

संपादने