छो
Bot: Reverted to revision 1730323 by 117.233.80.152 on 2020-01-15T15:36:02Z
छो (Pywikibot 3.0-dev) |
छो (Bot: Reverted to revision 1730323 by 117.233.80.152 on 2020-01-15T15:36:02Z) |
||
मेहकरातील बालाजीबरोबरच गोपालकृष्ण मंदिर, [[विठ्ठल]] मंदिर, [[गणपती]] मंदिर, [[दत्त]] मंदिर, [[चंदनशेष]] मंदिर, [[हनुमान]] मंदिर, महानुभाव मठ, पंचपीर, राममंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. यात मारुतीची ८ तर, गणपतीची ३ मंदिरे आहेत. शहरात मशिदींची संख्याही मोठी आहे. अलबेरुनीच्या ग्रंथात,[[आईन-ए अकबरी]] या अकबरनामाच्या तिसऱ्या भागातही येतो. एका मुस्लिम कवीने लिहून ठेवले आहे की, मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे याकाळात अस्तित्वात असलेले जुने गाव आहे. महसुली जिल्ह्याचे जसे हे पूर्वी मुख्य गाव होते, तसाच मेहकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा, असे मानले जाते.
धार्मिकता हा येथील माणसांच्या जगण्यातील अंगभूत गुण तसेच, त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कार्यही वाखाणण्याजोगे आहे. अनेक क्षेत्रांना या गावाने नेतृत्व प्रदान केले. कै.अण्णासाहेब देशमुख हे त्यापैकीच एक. दुसरबीड येथे त्यांनी उभारलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना. बुलढाणा जिल्हा सहकारी
==राजकीय पार्श्वभूमी==
जनपद सभेच्या काळात मेहकर व परिसरात दलितमित्र कै. आयाजी पाटील यांनी [[हुंडाबंदी]], सामूहिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, [[हरितक्रांती]], पर्यावरण या सर्वच क्षेत्रांत अजोड काम केले. त्यांच्या भारदस्त व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा युवकांवर मोठा प्रभाव होता. सहकार व शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांनी भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक नवीन नेतृत्वांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मेहकरात पहिल्यांदा मुख्यमंत्री आले. मेहकरच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले. माजी आमदार भाऊसाहेब लोढे हे त्यापैकीच एक. त्यांच्या कार्यकाळात मेहकरला पहिली पाणीपुरवठा योजना झाली. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मेहनत घेतली. मेहकर मतदारसंघात लोणार तालुकाही येतो. त्यामुळे त्या तालुक्यातही त्यांच्या कार्याची लोक आजही आठवण करतात. मतदारसंघ राखीव होता तेव्हा तुळशीराम कंकाळ, लक्ष्मण गवई, बळीराम वानखेडे हे आमदार येथे होऊन गेले.
नंतरच्या काळात म्हणजे १९९५ पासून मेहकर मतदारसंघातर्फे
शहराच्या नवीन भागात वाढ झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले. तेथे रस्ते, पाणी, नाल्या या समस्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी आणखी जोरकस प्रयत्नांची नागरिकांची मागणी आहे. शहराला सध्या आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होतो. हा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. कारण, कोराडी, पेनटाकळीसारखे मोठे प्रकल्पजवळ आहेत. [[चिखली]], बुलढाणा शहरांना येथून पाणी पुरवले जाते. ४० पेक्षा जास्त खेडेगावांना हे प्रकल्प शेतीबरोबरच पिण्याचे पाणी पुरवतात. मेहकरच्या पाणी पुरवठ्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. सुसूत्रता आणली तर दिवसाआडही पाणी पुरवणे शक्य असल्याचे यापूर्वी नलिनीताई खडसे व श्याम उमाळकर या नगराध्यक्षांनी दाखवून दिलेले आहे. शहरात एकही बगीचा नाही. जागा मात्र बऱ्याच ठिकाणी आरक्षित आहे. तेथे बागबगिचे होणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी शहरात टाऊन हॉलची गरज आहे.
ना.घं.नी मेहकरात मेहकर एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे महाविद्यालय, विद्यालय व कन्या विद्यालय आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला महाविद्यालय, विद्यालय व कॉन्व्हेंट सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकरात आणले. श्याम उमाळकर यांनी अध्यापक महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, फार्मसी विद्यालय, मॅनेजमेंट अभ्यासक्रम महाविद्यालय स्थापन केले. डॉ. सुभाष लोहिया यांनी महेश विद्या मंदिर, या इंग्रजी शाळेची भरीव प्रगती केली.डॉ. राम शिंदे यांनीही शैक्षणिक क्षेत्रात चांगली वाटचाल सुरू केली आहे,अध्यापक विद्यालय, पॉलिटेक्निक, CBSE पब्लिक स्कूल या संस्थाही त्यांनी सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली. संतांजी कॉन्व्हेंट, ज्ञानदीप कॉन्व्हेंट या इंग्रजी शाळा लक्षणीय कार्य शैक्षणिक क्षेत्रात करीत आहेत. कासमभाई गवळी यांनी उर्दू विद्यार्थ्यांसाठी उर्दू विद्यालय सुरू केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातली मेहकरची घोडदौड नजरेत भरण्यासारखी आहे.
पूर्वी बालाजी संस्थानमध्ये धर्मार्थ दवाखाना वैद्यांच्या सहकार्याने चालवला जायचा. वार्षिक तीन रुपये भरून वर्षभर मोफत औषधोपचार केला जायचा. आता मेहकरात ग्रामीण रुग्णालय आहे. उच्चशिक्षित डॉक्टरांचे ४७ दवाखाने आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. १९१६ मध्ये मानमोडीच्या (एन्फ्लुएंझा) रोगाने येथील शेकडो लोक दगावले. १९२० मधील दुष्काळात उपासमार झाली. १९२६ मध्ये प्लेगने असंख्य बळी घेतले. २ जातीय दंगली झाल्या तरीही होरपळलेली माणसे पुन्हा उभी झाली व गावाला प्रगतीची गती देत राहिली. कालानुरूप सर्व परिवर्तनाचा स्वीकार करत मेहकर ताठ मानेने उभे आहे.
|