"लीळाचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1727705 by 103.216.237.205 on 2020-01-07T07:53:45Z
ओळ १२:
 
==वि.भि कोलते संपादित लीळाचरित्रावर न्यायालयाची बंदी==
डॉ. वि.भि. कोलते यांनी संपादित केलेले लीळाचरित्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने इ.स. १९७८मध्ये प्रकाशित केले. या लीळाचरित्रात हिंदू देवी-देवतांची विटंबना करण्यात आली असून स्त्रियांची बदनामी करण्यात आल्याचे कोलते विरोधकांचे म्हणणे होते. वारकरी संप्रदायाचा विठ्ठल हा देव चोर, दरोडेखोर असून स्त्रियांचा भोग घेणारा होता, किंवा संत ज्ञानेश्वर यांना झोटिंग म्हणजे भूत प्रसन्न होते म्हणून ते चमत्कार दाखवायचे, अशा लिखाणाबरोबरच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींची विकृत प्रतिमा ग्रंथात रचली होती. अशा आक्षेपार्ह लिखाणामुळे वारकरी, महानुभाव पंथीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. हे सर्व सवंग लिखाण डॉ. कोलते यांनी स्वतःच्यास्वत:च्या मताने काही प्रक्षिप्‍त पोथ्यांच्या आधारे केले होते.
 
त्या लिखाणाचा संदर्भ देऊन १९८०मध्ये दर्यापूरकरबाबा आणि इतर चार जणांनी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि डॉ. वि.भि. कोलते यांच्या विरोधात अमरावतीच्या सत्र न्यायालयात दावा दाखल केला. दाव्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र सरकारने ग्रंथाच्या मुद्रण-प्रकाशनावर बंदी घातली. दाव्याच्या तब्बल १७ वर्षांनी १९९७ला सत्र न्यायालयाचे न्या. कुळकर्णी यांनी निकाल घोषित करून कोलते यांना २५ हजार रुपये व त्यावर १२ टक्के व्याज असा दंड करण्यात आला होता. तसेच कोलते संपादित लीळाचरित्राच्या सर्वच्या सर्व प्रती जप्‍त करण्यात याव्यात आणि वादींचा व शासनाचा सर्व खर्च कोलते यांनी द्यावा, असा निकाल न्या. कुळकर्णी त्यांनी दिला होता. शासनाने उपरोक्त निर्णय मान्य करून निर्णयाविरुद्ध अपिलात जाणार नाही, असा निर्णय विधानसभेत जाहीर करून ग्रंथाच्या सर्व प्रती जप्‍त करण्यात याव्यात, असे आदेश सर्व महाविद्यालये, विद्यापीठे आणि ग्रंथालयांना दिले होते.