"वसंतराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1698579 by ज on 2019-08-21T07:41:00Z
ओळ ४१:
''डॉ.'' '''वसंतराव देशपांडे''' ([[मे २]], [[इ.स. १९२०]] ; [[मूर्तिजापूर]], [[ब्रिटिश भारत]] - [[जुलै ३०]], [[इ.स. १९८३]] ; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतशैलीतील]] प्रसिद्ध गायक, [[मराठी]] संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.
 
वसंतराव देशपांड्यांनी [[असदअली खॉंखाँ]], [[सुरेशबाबू माने]], [[अमानतअली खॉंखाँ]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी [[आफ्रिका|अफ्रिकेचा]] दौरा केला. तसेच [[चित्रपट पेडगावचे शहाणे|पेडगावचे शहाणे]], [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]], [[दूध भात (चित्रपट)|दूधभात]], [[अवघाची संसार(चित्रपट)|अवघाची संसार]] वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि [[तबला]], [[संवादिनी]] या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. [[इ.स. १९८२]] सालच्या [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
वसंतराव देशपांडे यांचा नातू [[राहुल देशपांडे]] याच्यात वसंतरावांचे बरेच गुण उतरले आहेत.