"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1573174 by TivenBot on 2018-03-09T11:03:09Z
ओळ ३१:
 
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==
श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म ३० एप्रिल, [[इ.स.१९२६]] रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खॉंखाँ, निसार हुसेन खॉंखाँ आणि फैयाज हुसेन खॉंखाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
 
==संगीतकार==
ओळ ४२:
[[इ.स. १९६८]] सालापासून खळे साहेबांनी एचएमव्हीमध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी [[इ.स. १९७३]] साली ‘अभंग तुकयाचे’ हा [[संत तुकाराम|संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह [[लता मंगेशकर|लता मंगेशकरांकडून]], तर अभंगवाणी पंडित [[भीमसेन जोशी]] यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि [[भीमसेन जोशी]] यांच्या स्वरांत राम-श्याम गुणगान या नावाने एक भक्तिगीतांची तबकडी काढली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि [[सुरेश वाडकर]], [[कविता कृष्णमूर्ती]], [[वीणा सहस्रबुद्धे]], [[उल्हास कशाळकर]] अशा अजून कितीतरी कलाकारांनी गायलेलेल्या गीतांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
 
खळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वतःच्यास्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले. यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, सोबती ,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली (१) सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला (२) देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला; जिव्हाळातले (१) लळा जिव्हाळा शब्दच खोटे (२) प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, (३)या चिमण्यांनो परत फिरा रे (४) चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
 
श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी [[भावगीत]]-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित [[भीमसेन जोशी]], [[सुधीर फडके]], [[वसंतराव देशपांडे]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुमन कल्याणपूर]], [[माणिक वर्मा]], [[सुलोचना चव्हाण]] पासून ते [[हृदयनाथ मंगेशकर]], [[उषा मंगेशकर]], [[अरुण दाते]], [[सुधा मल्होत्रा]], [[सुरेश वाडकर]], [[देवकी पंडित]], [[कविता कृष्णमूर्ती]], [[शंकर महादेवन]] ते अगदी लिटिल चॅम्प [[आर्या आंबेकर]] यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. त्यांतली प्रसिद्ध गाणी: