"श्रीपाद दामोदर सातवळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1470210 by आर्या जोशी on 2017-04-14T11:43:27Z
ओळ ७३:
 
== बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २)==
या पुस्तिकांमध्ये व्यक्तीच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वतःचेस्वत:चे व्यक्तिमत्व अधिक समृध्द करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे.
मननाशिवाय नुसता शब्दोच्चार हा शब्दांचा ‘गोंगाट ‘ होईल . त्यामुळे त्या मननातून आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे” या हेतूने या पुस्तिकेमध्ये जे विचार दिले आहेत त्यांचे भाषांतर आणि आशय आवर्जून नोंदविले आहेत.
प्रथम भागामध्ये प्रामुख्याने तैत्तिरीय उपनिषदातील विचारांचा समवेश आहे. त्याजोडीने यजुर्वेद आणि अथर्ववेद संहितेतील अनुक्रमे एकेक मंत्र समाविष्ट आहे. द्वितीय भागात, ऋग्वेद, यजुर्वेद या संहितांमधील,ऐतरेय ,शतपथ , गोपथ या ब्राह्मण ग्रंथातील , ईश, केन, कठ, बृहदारण्यक,श्वेताश्वतर या उपनिषदातील निवडक सुवचनांचा समावेश केलेला आहे.