"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1707422 by 103.10.225.131 on 2019-09-27T10:40:00Z
ओळ ७२:
===इतर इतिहास===
'''कला आणि साहित्यिक वारसा लाभलेले संगमनेर''' - कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार अशी काही वैशिष्ट्ये असलेल्या संगमनेर शहराला मोठा साहित्यिक वारसा {{बदल}}
लाभलेला आहे. कवी अनंत फंदी हे संगमनेरचे पहिले ज्ञात साहित्यिक. त्यांनी लावण्या, विविध कवणे लिहिली पण त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला ' फटका ' या काव्यप्रकाराची ओळख करून दिली. समाजातील अपप्रवृत्ती, चुकीच्या गोष्टींवर त्यांनी आपल्या फटका या काव्यप्रकारातून शाब्दिक प्रहार केले. बिकट वाट वहिवाट नसावी हा त्यांचा अक्षरफटका म्हणजे मराठी काव्यक्षेत्रातील अनमोल रत्न आहे. त्यांनी श्री माधवग्रंथ नावाचा ओवीबद्ध ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्याच नावाने येथील संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ' कवी अनंत फंदी साहित्य ' पुरस्कार दिला जातो. अतिशय पारदर्शकपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा राज्यात मोठा लौकिक आहे. महत्त्वाचेमहत्वाचे म्हणजे कुणाही एका व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक प्रायोजकत्व न घेता लोकसहभागातून दिला जाणारा हा राज्यातील एकमेव साहित्य पुरस्कार आहे.
 
कवी नरहरसा संगमनेरकर यांनी अवघ्या मराठी मुलखात आपल्या शीघ्र कवित्वाने अधिराज्य गाजवले. यांचा जन्म किंवा मृत्यू याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्या काव्य रचनेवर खुश होऊन लोकमान्य टिळक, बालगंधर्व, शि. म. परांजपे, संगीतसूर्य केशवराव भोसले आदी मान्यवरांनी दिलेली पत्रे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहेत.
ओळ ९८:
संगमनेरची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरू केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘प्रायश्चित्त’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वतःचा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे, .डॉ .देवेंद्र ओहारा, डॉ. जी.पी.शेख, डॉ .श्रीकांत देशमुख, कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला. पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहीत नसल्याने प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.
 
संगमनेरमध्ये बनलेली पहिली दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वतःस्वत: लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा’ ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
 
संगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट ‘फुल टू धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले [[नामदेवराव जाधव]] यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली ‘कहा है मुस्कान?’ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्म्स केल्यानंतर आज २०१७ साली ते ‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतो आहे.
ओळ १०६:
ई.टी.व्ही. मराठी वाहिनीवरील “ क्राईम डायरी “ या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण २०११ साली संगमनेरात झाले. त्यात राजू कोदे, अंतून घोडके, वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, संगीता परदेशी,राजन झांबरे,जाकीर खान,शिवशंकर भारती, प्रदीप तापडिया यांनी काम केले होते.राजू कोदे यांनी क्राईम डायरीच्या अनेक भागात भूमिका केली आहे.
 
बंदिशाळा या मालिकेतून कलाकार म्हणून काम सुरू केलेले अंतून घोडके यांनी पुढे थॅंक्यूथँक्यू विठ्ठला, गणवेश या सिनेमांत काम केले. जाकीर खान या कलावंताने रायरंद (?) व इतर काही सिनेमांतून काम केले आहे. राजन झांबरे यांचा मुलगा अभिनय झांबरे याने ‘संगमनेरी घोडा’ या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका केली आहे.
 
वसंत बंदावणे यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांत संगमनेरच्या संस्कृतीवर आधारित ‘इथं नांदते एकात्मता’ हा विशेष कार्यक्रम होता. याशिवाय संगमनेरातील भाऊसाहेब थोरात, [[बाळासाहेब थोरात]], डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांचेसह अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी टी.व्ही.वर घेतल्या आहेत. बंदावणे यांनी संगमनेरचे सर्वाधिक कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर सदर केले आहेत. गाजलेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेतील कलावंत [[मुकेश खन्ना]] यांना २००० साली संगमनेरात आणून बंदावणे यांनी गर्दीचा उच्चांक मोडला होता. पंडित नेहरू जयंती शताब्दी निमित्त बालनाट्य महोत्सव घेऊन त्याच्या उद्घाटनाला महाभारत या मालिकेतील बाळकृष्णाची भूमिका करणारा केवल शहा याला आणले होते. भाऊसाहेब थोरात या महोत्सवाचे उद्घाटक होते. शालेय अभ्यासक्रमावर मनोरंजक फिल्म तयार करून ती सर्व शाळांमध्ये मुलांना दाखवण्यात आली होती. तिचे प्रकाशन १९८८ साली [[नानासाहेब गोरे]] यांनी केले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले