"ससा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1673017 by Yadav Harshali Arun on 2019-03-09T07:27:18Z
ओळ १:
[[File:2014-06-14 18.46.59 최광모.jpg|thumb|2014-06-14 18.46.59 최광모]]
ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे. सस्याचे दोन प्रकार असतात. रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. ते पाळीव नसतात किंवा त्यांना पाळणं कठीण असतं. काही शतकांपूर्वी त्यांचा खाण्यासाठी वापर केला जायचा. त्याचं मांस खूप स्वादिष्ट लागते. त्याची कातडी पण खूप मऊ असते. एका वेळेला सशाची मादी 10 ते 12 पिल्ले देते. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. सफेद ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात. ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. सशाच्या अनेक प्रजाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससे अनेक प्रकारचे असतात . ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात. ससे खूप चपळ आणि भित्र्या स्वभावाचे असतात. तो वेगाने उड्या मारत पळू शकतो. ससे 35 ते 40 मीटर प्रति तास या वेगाने धावू शकतात. ससे खरे तर तीन रंगात आढळतात. सफेद ( पांढरा), काळा किंवा तपकिरी. संपूर्ण जगात सस्यांच्या जवळपास 305 जाती आहेत. सास्याची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आहे तर सर्वात लहान जात आहे नेदरलॅंडनेदरलँड द्वार्फ आहे. ससे शक्यतो समूहाने राहातात. सास्याची मादी पिल्लांना जन्म देण्यापूर्वी, एक बीळ बनवते. त्यामध्ये पालापाचोळा आणि स्वतःचे केस वापरून उबदार वातावरण तयार करते. सस्यांच्या पिलांना जन्मताच केस नसतात आणि जन्मल्या नंतर ते आठवडाभर तसेच न डोळे उघता पडलेले असतात. दरम्यान त्यांच्या अंगावर केस येण्यास सुरुवात होते. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. गवत हे त्याचं मुख्य आणि आवडत अन्न आहे. सस्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते कारण त्याला उलटी करता येत नाही. सस्यांचे कान शकयतो 3 ते 4 इंचाचे असतात. सस्यांच्या तोंडात 28 दात असतात. सस्यांचे डोळे अश्या प्रकारे असतात की त्यांना त्यांच्या चहुबाजूंचं दिसू शकते. त्यामुळे त्यांना पकडणं जरा जास्तच अवघड काम असते. पण त्याला बरोबर नाकासमोर दिसू शकत नाही. सस्याची नजर, ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता चांगली असते. ससा शिकाऱ्याच्या वासावरून त्याला ओळखू शकतो. सस्यांच्या मिशा या त्याच्या रुंदी एवढ्या असतात. त्यामुळे त्याला हे समजण्यास मदद होते की एखाद्या बिळात तो जाऊ शकतो की नाही. ससे दिवसातून किमान आठ वेला झोप (डुलकी) घेतात. सस्यांना घाम येत नाही. ते त्यांच्या कानाद्वारे आणि त्वचेद्वारे उष्णता बाहेर फेकतात. सस्याचे आयुष्य कमी असते. शक्यतो ससे दहा ते बारा वर्षे जगु शकतात. ही सर्व सस्याबद्दलची माहिती.
 
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ससा" पासून हुडकले