"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1640934 by Amrut Mohite on 2018-11-16T17:21:14Z
ओळ ४५:
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] कोरेगाव तालुक्यातील भाडळे या गावी १० मार्च, इ.स. १९१८ रोजी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.
 
कोरेगावमध्ये मराठी तिसरीपर्यंतच सौदागरांचे शिक्षण झाले. शाळेत कोणीकॊणी पाहुणा येणार असेल तर ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई. शाळेला भेट देणार्‍या दामूअण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील नागनाथ गोरे यांच्याकडे या मुलाची मागणी केली. सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले.
 
[[प्र.के. अत्रे]] यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री-भूमिका होती. त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरुवातीला स्त्रीभूमिका आणि मग पुरुष भूमिका होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | शीर्षक = ''छोटा गंधर्व डेड'' (''छोटा गंधर्व वारले'') : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जानेवारी, इ.स. १९९८ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. [[अनंत हरी गद्रे]] ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=135&contentid=20090605200906050209319779e238541&subsite= | शीर्षक = ''राग मफिन'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख|विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/PEqZ |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = मुंबईमिरर.कॉम | दिनांक = ५ जून, इ.स. २००९ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.