"जानकी तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
(काही फरक नाही)

१८:५९, १ एप्रिल २०२० ची आवृत्ती

राजापूर तालुक्यातील पाथर्डे नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या सिनकर कुलातील कन्या.

व्यक्तिगत जीवन

त्यांच्या वडिलांचे नाव पर्शराम. ते पोलिस खात्यात होते. त्यांना आठ अपत्ये होती. जानकी आक्का या सगळ्यात मोठ्या. १९१२ मध्ये जानकी आक्कांचा जन्म झाला. चार इयत्तांपर्यंत शिक्षण झाले व वयाच्या १२-१४ व्या वर्षी लग्न झाले. आक्कांचे यजमान मोरेश्वर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने आक्का एकुलत्या एक मुलाला कडेवर घेऊन माहेरी आल्या. ते मूलही काळाने ओढून नेले. त्यांचे मामा दिनकर साखळकर आणि राजापूर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी उत्तेजन देऊन त्यांना पुढे शिक्षण घेण्यास सांगितले. कन्याशाळेतून त्या सहावी म्हणजे फायनल परीक्षा उत्तीर्ण झाल्या.