"कमलाबाई देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
डॉ.कमलाबाई गोपाळराव देशपांडे जन्म- ([[२२ फेब्रुवारी]], [[इ.स.१८९८]]), मृत्यू-([[८ जुलै]], [[इ.स.१९६५|१९६५]]) या रोजी झाला. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी ‘भारत सेविका समाजा’ची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांच्या प्रेरणेतून त्यांचे कार्य उभेे राहिले. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेच्या त्या आजीव सदस्या होत्या.
==जीवन==
कमलाबाई यांचे वडील साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर. त्यांचा विवाह सातार्‍याचे गोपाळराव कुशाभाऊ देशपांडे ह्यांच्याशी दि. २८ मे १९१० रोजी झाला. १९१२ च्या डिसेंबर महिन्यात त्यांना पुत्रप्राप्ती झाली. दुर्दैवाने १९१३ मध्ये गोपाळरावांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि कमलाबाई विधवा झाल्या. त्या काळात विधवांची स्थिती अतिशय वाईट होती. केशवपनाची रूढी होती. पण कमलाबाई ह्या रूढींपुढे नमल्या नाहीत. सकेशा विधवा म्हणून वावरताना त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. विधवेच्या वाट्याला येणारी अवहेलना त्यांच्याही वाट्याला आली. पण हे सगळे सहन करीत १९१७ मध्ये पुण्याच्या हुजूरपागेतून त्या मॅट्रिक झाल्या. १९२० मध्ये पुण्याच्या कर्वे विद्यापीठातून त्यांनी गृहिता गमा (जी.ए.) पदवी मिळविली. याच काळात स्त्रीने शिकून, आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे या विचारातून महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रमाचे काम सुरू केले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कन्याशाळा निघाल्या तर स्त्रीशिक्षणाचा प्रसार होईल ह्या अण्णांच्या आवाहनाला सातार्‍यातील डॉ. पंढरीनाथ घाणेकर, डॉ. मो. ना. आगाशे, कमलाबाईंचे दीर वाग्भट देशपांडे यांनी प्रतिसाद दिला. वाग्भट देशपांडे ह्यांच्या घराच्या ओसरीवर १९२२ च्या आश्‍विन अमावस्येला सातार्‍याच्या कन्याशाळेचा प्रारंभ झाला. कमलाबाईंवर शाळेच्या प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली. आपल्या पुढील शिक्षणाचा विचार बाजूला सारून कमलाबाईंनी ही जबाबदारी स्वीकारली.
ओळ १०:
 
==साहित्य लेखन व पुस्तके==
कमलाबाईंनी कथा, कविता, शब्दचित्रे असे विविध लेखन केले आहे. सतीबंदी कायद्यापासून ते हिंदू कोड बिलापर्यंत स्त्रियांसाठी असणार्‍या कायद्यांचा अभ्यास करून ‘स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला १९६१ चा न. चिं. केळकर वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘स्मरणसाखळी’ ह्या कमलाबाईंच्या आत्मचरित्रात त्या काळातील विधवा स्त्रियांच्या स्थितीचे प्रातिनिधिक चित्रण आहे. १९४३ मध्ये ते प्रकाशित झाले. स्त्रीगीतांचे संशोधन करून त्यांनी ‘अपौरुषेय वाङ्मय अर्थात स्त्रीगीते’ हे पुस्तक लिहिले. अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, महाराष्ट्रातील संतस्त्रिया याविषयी त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यानमालेतही त्यांचा सहभाग असे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी ‘भारत सेविका समाजा’ची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांच्या प्रेरणेतून त्यांचे कार्य उभेे राहिले.
 
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी ‘भारत सेविका समाजा’ची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांच्या प्रेरणेतून त्यांचे कार्य उभेे राहिले. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेच्या त्या आजीव सदस्या होत्या.