"कमलाबाई देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
==सामाजिक कार्य==
कमलाबाईंचे व्यक्तिमत्त्व कर्तव्यकठोर होते. त्याचबरोबर सर्वांविषयी आपलेपणा, ध्येयवाद, कार्यनिष्ठा, तेजस्वी बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता हेही विशेष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. स्वत:च्या उत्पन्नाचा २० टक्के भाग त्या सामाजिक कार्यासाठी देत. सुरुवातीच्या काळात इतर शिक्षकांचे पगार त्यांनी दिले. स्वत: विनावेतन काम केले. शाळा सारवणे, भिंती रंगवणे इथपासून घरोघरी जाऊन पैसे जमा करणे, शाळेसाठी मुली जमविणे ही सर्व कामे कमलाबाई करीत. काही वर्षे पुण्याच्या महिला पाठशाळेत संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. हुजुरपागेच्या मुलींच्या कॉलेजात प्राचार्या म्हणून व नंतर पुणे विद्यापीठात एम. ए. च्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक म्हणून कमलाबाई काम करीत होत्या.
==परदेश शिक्षण==
१६ मार्च १९२९ रोजी त्यांनी परदेशी प्रयाण केले. १९३१ मध्ये त्यांचा ‘द चिल्ड्रन ऑफ एन्शन्ट इंडिया’ या विषयावरील प्रबंध पूर्ण झाला. त्यांना झेकोस्लोव्हाकियाच्या प्राग विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मिळाली. प्रबंधासाठी त्यांनी जर्मन भाषेचा अभ्यास केला. परदेशातील वास्तव्यात त्यांनी आपला पेहराव, आपला आहार, आपली राहणी, आपले विचार, आपली संस्कृती ह्यात कधीही कोणताही बदल केला नाही. भारतात परत आल्यावर त्यांचे कार्य चालू राहिले.