"मालती केशव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
१९५३ ते १९५८ या काळात बाईंनी शासकीय जबाबदार्‍या घेऊन पार पाडल्या. महिला सेवाग्राम, पुणे रिमांड होम, बेगर्स होम चेंबूर, नाशिक व मुंढव्याचे सर्टिफाईड स्कूल इत्यादी. याच काळात सर्वसामान्यांबरोबरच अनेक कर्णबधिरांचे पुनर्वसनही बाईंनी तळमळीने केले. १९५८ मध्ये त्यांची राजपत्रित अधिकारी (गॅझेटेड ऑफीसर) म्हणून बंगला, गाडी या सोयींसह नियुक्ती झाली. परंतु या ठिकाणी राहून आपण मनाप्रमाणे काम करू शकणार नाही असे त्यांच्या लक्षात आले. त्या क्षणी त्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. एम.एड.ला त्यांनी ‘एज्युकेशन फॉर डेफ इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्सेस टू महाराष्ट्र’ या विषयात प्रबंध तयार केला. त्याच वेळेस हेलेन केलर मुंबई भेटीवर आल्या असताना त्यांनाच तो अर्पण केला.
==सामाजिक कार्य==
प्रौढ विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याबरोबरच त्यांची लग्ने जमवणे, घरगुती प्रश्‍न सोडविणे, न्यायालयात दुभाषक म्हणून कर्णबधिरांची कैफियत न्यायाधीश व इतरांपर्यंत पोचवणे ही कामे बाईंनी जबाबदारीने केली. बाईंच्या काळात अनेक मान्यवरांनी शाळेला भेटी व देणग्या दिल्या. या सर्व कार्यात झोकून देऊन काम करताना बाईंनी निश्‍चय केला होता. जो पर्यंत प्रत्येक कर्णबधिराला श्रवणयंत्र मिळणार नाही तो पर्यंत मी कानात कर्णफुले घालणार नाही असा निश्‍चय त्यांनी केला व तो आजतागायत पाळला आहे. पुण्यातील बाजीराव रोड वरच्या टेलिफोन भवनाजवळील चौकाला श्रवणयंत्राचे संशोधक सऱ ग्रॅहॅम बेल यांचे नाव देण्यास त्यांनी म.न.पा. व टेलिफोन भवनातील अधिकार्‍यांना भाग पाडले. समावेशित शिक्षणाची संकल्पना (इंटिग्रेटेड एज्युकेशन) ही बाईंचीच. सर्वसामान्य मुलांबरोबर जर कर्णबधिर मूल शिकले, तर त्याची भाषा वाढ चांगली, योग्य होईल ही त्यांची इच्छा होती. त्यांनी पुण्यात गोपाळ हायस्कूल व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळेत ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. हा उपक्रम कन्याशाळेत आजही चांगल्या रितीने चालू आहे. हळूहळू मॉडर्न हायस्कूल, आपटे प्रशाला, भावे विद्यालय, साधना विद्यालय यातूनही हा उपक्रम सुरू करण्यात आला. याचा लाभ आजही अनेक विद्यार्थी घेत आहेत. यामुळे मुलांचे सामाजिकरण योग्य रीतीने होऊन आत्मविश्‍वास वाढतो व स्वावलंबी होण्यास अडचणी कमी येतात. २३ जुलै १९७३ रोजी ‘सुहृद मंडळ’ ही विशेष शाळा व संस्था आपल्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन सुरू केली. १९८१ च्या अपंग वर्षात श्रीमती ताराबाई वर्तक मंत्री असताना शाळा भेट घडवून आणून ‘शुल्क’ माफ करवून घेण्याचे महत्त्वाचे कामही केले.
प्रौढ विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याबरोबरच त्यांची लग्ने जमवणे, घरगुती प्रश्‍न सोडविणे, न्यायालयात दुभाषक म्हणून कर्णबधिरांची कैफियत न्यायाधीश व
 
==लेखन संग्रह==
विद्या महामंडळ संस्थेने बाईंनी रचलेल्या ओव्या व कवितांचे संकलन करून १ डिसेंबर २००५ ला पु. ग. वैद्य यांच्या प्रेरणेने ‘कर्ण-बधिरांच्या भावविश्‍वात’ हा संग्रह प्रकाशित केला. ‘माझी माणसे’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद बाईंनी केला आहे.
 
==सन्मान व पुरस्कार==
शिक्षण संचालनालयतर्फे ‘आदर्श विशेष शिक्षिका पुरस्कार’,
समाजकल्याणतर्फे ‘दलित मित्र पुरस्कार’,
पुणे महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’,
कर्णबधिर मित्र मंडळातर्फे कै. सौ. निर्मला रत्नाळीकर पुरस्कार,
पुणे व रत्नाळीकर परिवार, (२००१) व विद्या महामंडळ, पुणे तर्फे ‘लोक शिक्षण पुरस्कार’ (२००५) या पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठ, लायन्स कल्ब, रोटरी क्लब व इतर संस्थांचेही पुरस्कार मालतीबाईं यांना मिळाले आहेत.