"मालती केशव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
मालती केशव जोशी उर्फ मालती अनंत खरे ([[२० जून]], [[इ.स. १९२६|१९२६]]:[[बडोदा]] -) यांनी गणित विषयात बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर १९५५ मध्ये एम.एड. केले. त्यानंतर त्यांनी बी.ए. गणित, एम. एड., डिप्लोमा इन टीचर ऑफ द डेफ एज्युकेशन  (मँचेस्टर. यु. के.) केले.
==कर्णबधिरांचे शिक्षण व अभ्यास==
मालती बाईंनी महाराष्ट्रभर कर्णबधिरांच्या शिक्षणाचा प्रसार केला. बाईंचे वडील अनंतराव खरे हे सेवासदन शाळेचे मुख्याध्यापक होते. परंतु काहीही सोय किंवा नियम नसल्याने स्वतःच्या प्रतिभा नावाच्या कर्णबधिर मुलीला मात्र ते आपल्या शाळेत प्रवेश देऊ शकले नाही. बाईंच्या मनात मात्र आपण या बाबतीत काहीच करू शकणार नाही का? असा प्रश्‍न सतत घोळत असे. बाईंच्या लग्नानंतर त्यांना कळले की, इंग्लंडमधे अशी मुले शिकतात, एवढेच नाही तर शिक्षक प्रशिक्षणही दिले जाते. पण तोपर्यंत घरात दोन मुलांचा जन्म झालेला होता. हा यक्षप्रश्‍न केशव जोशी त्यांचे पती यांनी सहजरीत्या सोडविला. मुलांची जबाबदारी एक वर्षभर घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आणि बाई मँचेस्टरला रवाना झाल्या. मँचेस्टर येथे त्यांनी ‘डिप्लोमा इन टीचर ऑफ द डेफ’ एज्युकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केला. वर्षभरात परत आल्यावर शाळा सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्या वेळचे जिल्हाधिकारी स. गो. बर्वे यांनी सहमती व पाठिंबा दर्शविला. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळींच्या ना. वि. पाटणकरांना भेटून या शिक्षणाची गरज पटवून दिली व त्यांची परवानगी मिळविली. टिळक बी.एड. महाविद्यालयाच्या बाहेर फरशीवरच ही शाळा सुरू झाली. बहीण प्रतिभासह तिच्या वयाच्या सुनंदा काटे, पेंढारकर अशा पाच मुलींच्या पटसंख्येने ही ‘राखोलीची शाळा’ सुरू झाली. शिक्षक नाही, अबोल मुले बोलणार काय? या प्रश्‍नांच्या सरबत्तीला द्यायला उत्तर सापडत नव्हते. पण शोध व ध्यास मनात होताच. अशातच काही कारणाने त्या बनारसला गेल्या. येताना आजोळी बडोद्याला छोटा मुक्कामात प्रश्‍नाचे उत्तर सापडले. मामांनी जामदार नावाच्या शिक्षकांची गाठ घालून दिली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेऊनच बाई पुण्यात परतल्या व शाळेला शिक्षक मिळाला. शिक्षकांची संख्या दोन झाली. तसेच मुलांचीही संख्या वाढू लागली. पालक स्वतःच मुलांना आणत व परत नेत. आपणही शाळेत जातो याचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहू लागला. विद्यार्थीसंख्या ४० वर गेली. नवीन आलेली मुले वयाने मोठी होती. त्यामुळे व्यवसाय शिक्षण हेच महत्त्वाचे शिक्षण ठरू लागले. सुतारकाम, खडी छपाई, खेळणी तयार करणे. याचे शिक्षण मुलांना मिळू लागले.
==कार्यकीर्द==
१९५६-५७ मध्ये निधी, स्मृतिप्रित्यर्थ या देणगीतून नवीन इमारत उभी राहून शाळा भरू लागली. विद्यार्थीसंख्या वाढू लागली पण प्रशिक्षित शिक्षकच उपलब्ध नव्हते. त्यासाठी खटपट करून अभ्यासक्रम तयार केला. त्या वेळी फक्त कोलकत्यातच अशा प्रकारचे प्रशिक्षण देणे सुरू होते. शाळेत येणार्‍या श्रीमती आगाशेंना तिथे पाठवून ३ महिन्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्यास मान्यता मिळविली. (हा अभ्यासक्रम त्या वेळी बी.एड. च्या समकक्ष मानून शिक्षकांना मान्यता मिळाली.) १९७० मधे केंद्र सरकारचे अनुदान मिळाल्याने लहान कर्णबधिरांसाठी बाह्यध्वनीविरहित खोलीची सोय शाळेत करता आली. फारच थोडी मुले योग्य वयात शाळेत येत. लहान वयातच कर्णबधिरत्व लक्षात आल्यास वा आणून दिल्यास मुले योग्य वयात शाळेत येऊ शकतील, हे अनुभवाने कळले व त्यातून १९७८ साली शोध मोहीम संकल्पना उदयास आली. त्यासाठी निश्‍चित व ठोस कार्यक्रम तयार केला गेला व तो राबविण्यासाठी मंगळवार रूग्णालय, कमला नेहरू रूग्णालय, व ससून रूग्णालय यांची परवानगी मिळवून नवजात अर्भकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली.
मालती बाईंनी महाराष्ट्रभर कर्णबधिरांच्या शिक्षणाचा प्रसार केला. बाईंचे वडील अनंतराव खरे हे सेवासदन शाळेचे मुख्याध्यापक होते. परंतु काहीही सोय किंवा नियम नसल्याने स्वतःच्या प्रतिभा नावाच्या कर्णबधिर मुलीला मात्र ते आपल्या शाळेत प्रवेश देऊ शकले नाही. बाईंच्या मनात मात्र आपण या बाबतीत काहीच करू शकणार नाही का? असा प्रश्‍न सतत घोळत असे. बाईंच्या लग्नानंतर त्यांना कळले की, इंग्लंडमधे अशी मुले शिकतात, एवढेच नाही तर शिक्षक प्रशिक्षणही दिले जाते. पण तोपर्यंत घरात दोन मुलांचा जन्म झालेला होता. हा यक्षप्रश्‍न केशव जोशी त्यांचे पती यांनी सहजरीत्या सोडविला. मुलांची जबाबदारी एक वर्षभर घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आणि बाई मँचेस्टरला रवाना झाल्या. मँचेस्टर येथे त्यांनी ‘डिप्लोमा इन टीचर ऑफ द डेफ’ एज्युकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
वर्षभरात परत आल्यावर शाळा सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्या वेळचे जिल्हाधिकारी स. गो. बर्वे यांनी सहमती व पाठिंबा दर्शविला. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळींच्या ना. वि. पाटणकरांना भेटून या शिक्षणाची गरज पटवून दिली व त्यांची परवानगी मिळविली. टिळक बी.एड. महाविद्यालयाच्या बाहेर फरशीवरच ही शाळा सुरू झाली. बहीण प्रतिभासह तिच्या वयाच्या सुनंदा काटे, पेंढारकर अशा पाच मुलींच्या पटसंख्येने ही ‘राखोलीची शाळा’ सुरू झाली. शिक्षक नाही, अबोल मुले बोलणार काय? या प्रश्‍नांच्या सरबत्तीला द्यायला उत्तर सापडत नव्हते. पण शोध व ध्यास मनात होताच. अशातच काही कारणाने त्या बनारसला गेल्या. येताना आजोळी बडोद्याला छोटा मुक्कामात प्रश्‍नाचे उत्तर सापडले. मामांनी जामदार नावाच्या शिक्षकांची गाठ घालून दिली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेऊनच बाई पुण्यात परतल्या व शाळेला शिक्षक मिळाला. शिक्षकांची संख्या दोन झाली. तसेच मुलांचीही संख्या वाढू लागली. पालक स्वतःच मुलांना आणत व परत नेत. आपणही शाळेत जातो याचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहू लागला. विद्यार्थीसंख्या ४० वर गेली. नवीन आलेली मुले वयाने मोठी होती. त्यामुळे व्यवसाय शिक्षण हेच महत्त्वाचे शिक्षण ठरू लागले. सुतारकाम, खडी छपाई, खेळणी तयार करणे. याचे शिक्षण मुलांना मिळू लागले.