"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
कुपोषण म्हणजे काय ? कुपोषणाचे किती प्रकार आहेत?
ओळ २२:
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.
 
दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला '''कुपोषण''' म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे , खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत
 
जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन. कुपोषणाचे तीन गटात विभाजन करता येते.
 
१.   उंचीच्या मानाने वजन कमी असणे
 
२.   वयाच्या मानाने वजन कमी असणे
 
३.   आहारील आवश्यक सूक्ष्म घटकांची कमतरता असणे (जीवनसत्वे व खनिजांची कमतरता) किंवा अधिक प्रमाणात असणे
 
४.   लट्ठ पणा किंवा इतर असांसार्गिक आजार यामुळे होणारे कुपोषण
 
कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.
 
# '''उंचीच्या मानाने वजन कमी असणे''' : अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. हि लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.
# '''वयाच्या मानाने कमी उंची असणे:''' हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, आई सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.
# '''सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण :''' आहारातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormones ची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. आयोडिन, अ जीवनसत्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर माता यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
# '''जास्तीचे वजन आणि लट्ठपणा:'''  एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
 
==कारणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले