"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५:
| मृत्युस्थान = [[तैपे|तैहोको]], [[तैवान]]
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|अखिल भारतीय काँग्रेसकॉंग्रेस]] <br /> [[फॉरवर्ड ब्लॉक]] <br /> [[आझाद हिंद फौज]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
ओळ ५८:
 
== स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य ==
[[चित्र:Bose AICC meeting 1939.jpg|right|300px|thumb|१९३९च्या अखिल भारतीय काँग्रेसकॉंग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस.<small>छायाचित्र:टोनी मित्रा</small>]]
 
[[कोलकाता|कोलकात्त्यातील]] ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, [[देशबंधू चित्तरंजन दास]] ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंबरोबर]] काम करण्याची इच्छा होती. [[इंग्लंड|इंग्लंडहून]] त्यांनी [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ओळ ६६:
[[महात्मा गांधी|गांधींजीनी]] देखिल [[कोलकाता|कोलकत्याला]] जाऊन [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंबरोबर]] काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू [[कोलकाता|कोलकात्त्याला]] आले व [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] भेटले. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारच्या विरोधात [[असहकार आंदोलन]] चालवले होते. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[बंगाल|बंगालमध्ये]] ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
 
[[इ.स. १९२२|१९२२]] साली [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंनी]] काँग्रेसकॉंग्रेस अंतर्गत [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाची]] स्थापना केली. [[विधानसभा|विधानसभेच्या]] आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, [[कोलकाता]] महापालिकेची निवडणूक, [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाने]] लढवून, जिंकली. स्वतः [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[कोलकाता|कोलकात्त्याचे]] महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना [[भारत|भारतीय]] नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
 
लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंसह]], सुभाषबाबूंनी काँग्रेसकॉंग्रेस अंतर्गत [[इंडिपेंडन्स लिग|इंडिपेंडन्स लिगची]] स्थापना केली. [[इ.स. १९२८|१९२८]] साली जेव्हा [[सायमन कमिशन]] [[भारत|भारतात]] आले, तेव्हा काँग्रेसनेकॉंग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. [[सायमन कमिशन|सायमन कमिशनला]] उत्तर देण्यासाठी, काँग्रेसनेकॉंग्रेसने [[भारत|भारताच्या]] भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. [[मोतीलाल नेहरू|पंडित मोतीलाल नेहरू]] ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने [[नेहरू रिपोर्ट]] सादर केला.
 
[[इ.स. १९२८|१९२८]] साली काँग्रेसचेकॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन [[मोतीलाल नेहरू|पंडित मोतीलाल नेहरूंच्या]] अध्यक्षतेखाली [[कोलकाता|कोलकात्त्यात]] झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, [[मोतीलाल नेहरू|पंडित मोतीलाल नेहरूंना]] लष्करी पद्धतीने सलामी दिली. [[महात्मा गांधी|गांधींजी]] त्याकाळी [[पूर्ण स्वराज|पूर्ण स्वराजच्या]] भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून [[वसाहतीचे स्वराज्य]] मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व [[पंडित जवाहरलाल नेहरू]] ह्यांना, [[पूर्ण स्वराज|पूर्ण स्वराजच्या]] भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर [[वसाहतीचे स्वराज्य|वसाहतीचे स्वराज्याची]] मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेसकॉंग्रेस [[पूर्ण स्वराज|पूर्ण स्वराजची]] मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, [[इ.स. १९३०|१९३०]] साली काँग्रेसचेकॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंच्या]] अध्यक्षतेखाली [[लाहोर|लाहोरला]] झाले, तेव्हा असे ठरवले गेले की [[जानेवारी २६]] हा दिवस [[स्वातंत्र्यदिन]] म्हणून पाळला जाईल.
 
[[जानेवारी २६]], [[इ.स. १९३१|१९३१]] च्या दिवशी, [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबू [[तिरंगा|तिरंगी ध्वज]] फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु [[भगत सिंग|सरदार भगतसिंग]] आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. [[भगत सिंग|भगतसिंगांची]] फाशी रद्ध करावी ही मागणी [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे [[महात्मा गांधी|गांधींजीना]] मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व [[भगत सिंग|भगतसिंग]] आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. [[भगत सिंग|भगतसिंगांना]] वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, [[महात्मा गांधी|गांधींजी]] व काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
 
२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व [[अस्पृश्यता]] यावर चर्चा झाली.<ref>https://books.google.co.in/books?id=boCDDwAAQBAJ&pg=RA2-PA1942&lpg=RA2-PA1942&dq=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&source=bl&ots=s_oztjMot6&sig=ACfU3U2W0-B9SUdAwABfr0Hp2gGOL4UHjw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjlyqT_-p3nAhXl7HMBHUY6DYYQ6AEwDXoECAgQAQ#v=onepage&q=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&f=false</ref>
ओळ १०३:
[[इ.स. १९३४|१९३४]] साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने [[कराची]] मार्गे [[कोलकाता|कोलकात्त्याला]] परतले. [[कराची|कराचीला]] पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. [[कोलकाता|कोलकात्त्याला]] पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा [[युरोप|युरोपला]] धाडले.
 
== हरीपुरा काँग्रेसचेकॉंग्रेसचे अध्यक्षपद ==
 
[[इ.स. १९३८|१९३८]] साली काँग्रेसचेकॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन [[हरिपुरा]] येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] काँग्रेसचेकॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचेकॉंग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.
 
ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.
ओळ १११:
आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी [[योजना आयोग]] स्थापना केला. [[जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरू]] त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी [[बेंगलोर]] येथे प्रसिद्ध वैज्ञानिक [[सर विश्वेश्वरैय्या]] ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.
 
[[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये [[जपान|जपानने]] [[चीन|चीनवर]] आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसनेकॉंग्रेसने [[चीन|चिनी]] जनतेला साहाय्य करण्यासाठी, [[डॉ द्वारकानाथ कोटणीस]] ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी [[भारत|भारताच्या]] स्वातंत्र्यलढ्यात [[जपान|जपानची]] मदत मागितली, तेव्हा त्यांना [[जपान|जपानचे]] हस्तक व [[फाशीवाद|फॅसिस्ट]] म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न [[जपान|जपानचे]] हस्तक होते, न ही [[फाशीवाद|फॅसिस्ट]] विचारसरणीशी सहमत होते.
 
== काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा ==
 
[[इ.स. १९३८|१९३८]] साली [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास [[युरोप|युरोपात]] [[दुसरे महायुद्ध|द्वितीय महायुद्धाची]] छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की [[इंग्लंड|इंग्लंडच्या]] कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, [[भारत|भारताचा]] स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. [[महात्मा गांधी|गांधीजी]] ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.
 
[[इ.स. १९३९|१९३९]] मध्ये जेव्हा नवीन काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण [[महात्मा गांधी|गांधीजी]] आता ते नको होते. [[महात्मा गांधी|गांधीजीनी]] अध्यक्षपदासाठी [[पट्टाभि सितारमैय्या]] ह्यांची निवड केली. कविवर्य [[रवींद्रनाथ ठाकूर]] ह्यांनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. [[प्रफुल्लचंद्र राय]], [[मेघनाद साहा]] सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.
 
सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः [[महात्मा गांधी|महात्मा गांधीनी]] [[पट्टाभि सितारामैय्या]] ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर [[पट्टाभि सितारामैय्या|पट्टाभी सितारमैय्यांना]] १३७७ मते मिळाली. [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.
 
पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. [[पट्टाभि सितारामैय्या|पट्टाभि सितारामैय्यांची]] हार ही आपली स्वतःची हार मानून, [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधूनकॉंग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेसकॉंग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. [[जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरू]] तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.
 
[[इ.स. १९३९|१९३९]] सालचे वार्षिक काँग्रेसकॉंग्रेस अधिवेशन [[त्रिपुरी]] येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. [[महात्मा गांधी|गांधीजी]] ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. [[महात्मा गांधी|गांधीजींच्या]] साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.
 
अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण [[महात्मा गांधी|गांधीजी]] व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, [[एप्रिल २९]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 
== फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ==
 
[[मे ३]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेसकॉंग्रेस अंतर्गत [[फॉरवर्ड ब्लॉक]] नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेसकॉंग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे [[फॉरवर्ड ब्लॉक]] हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
 
[[दुसरे महायुद्ध]] सुरू होण्यापूर्वीच, [[फॉरवर्ड ब्लॉक|फॉरवर्ड ब्लॉकने]] [[भारत|भारताचा]] स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित [[फॉरवर्ड ब्लॉक|फॉरवर्ड ब्लॉकच्या]] सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. [[दुसरे महायुद्ध]] सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
ओळ १५६:
[[ऑक्टोबर २१]], [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी, नेताजींनी [[सिंगापूर|सिंगापुरात]] अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेचे]] सरसेनापतीही बनले.
 
[[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] [[जपान|जपानी]] लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या [[भारत|भारतीय]] युद्धबंद्यांना भरती केले गेले. [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] स्त्रियांसाठी [[झाँसीझॉंसी की रानी]] रेजिमेंटही बनवली गेली.
 
पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक [[भारत|भारतीय]] लोकांना [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी ''तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगादूॅंगा'' असा नारा दिला.
 
[[दुसरे महायुद्ध|द्वितीय महायुद्धाच्या]] काळात, [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेने]] [[जपान|जपानी]] लष्कराच्या साथीने [[भारत|भारतावर]] आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी ''चलो दिल्ली'' अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे ''शहीद आणि स्वराज बेटे'' असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून [[इंफाळ]]वर व [[कोहिमा|कोहिमावर]] आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.
 
[[आझाद हिंद फौज]] माघार घेत असताना, [[जपान|जपानी]] लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी [[झाँसीझॉंसी की रानी]] रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.
 
[[जुलै ६]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी [[आझाद हिंद रेडियो]] वरचे आपले भाषण नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]], [[जपान|जपानकडून]] मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा [[आझाद हिंद फौज]] ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींचा]] राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी [[महात्मा गांधी|गांधीजींना]] सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
ओळ १८६:
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त [[भारतरत्‍न]] प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे.
 
==सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचेमहत्त्वाचे मुद्धे ==
# सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.
# सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
# सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचेकॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
# नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
# डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.