"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Added comma
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
'''डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.
 
1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचेकॉंग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचेबॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
 
पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.
ओळ ३०:
शंकरराव चव्हाण सभागृह, एसजीजीएस स्टेडियम जवळ एनडब्ल्यूसीएमसीचे डॉ शंकरराव चव्हाण स्मारक, व्हीआयपी रोड,
शंकरराव चव्हाण चौक कामठा-नांदेड,
शंकरराव चव्हाण चौक चिमेगाव-नांदेड,शंकरराव चव्हाण गार्डन अँडॲंड लायब्ररी,सिडको,नांदेड 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.