६३,६६५
संपादने
छो (Pywikibot 3.0-dev) |
छो (Pywikibot 3.0-dev) |
||
युरोपमधील हा व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत. त्यात अनेक चर्चेस, कलात्मक प्रासाद, संग्रहालये आणि पुस्तकालये आहेत. या स्वतंत्र, पण लहानग्या देशाचे क्षेत्रफळ अवघे ४४ हेक्टर (१०९ एकर) आहे आणि लोकसंख्या फक्त एक हजार. अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. सन १९३०मध्ये ‘पोप’नी तिथे आपले चलन जारी केले. आर्थिक व्यवहार ‘युरो’मध्ये चालतात. १९३२ साली शहरात रेल्वे स्टेशन निर्माण झाले. ११ फेब्रुवारी १९२९ रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
इसवी सनाच्या आठव्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला. त्याला ‘पेपल स्टेट्स’ असे नाव होते. सन १८७०मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे. कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन १९२९मध्ये दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची १०९ एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने ‘व्हॅटिकन सिटी’ उदयास आली. तिथूनच जगभरातल्या सर्व कॅथॉलिक चर्चेसचे संचालन केले जाते. इसवी सन ३० ते ६४ या काळात ‘पोप’ म्हणून सेंट पीटरने कार्यभार चालवला. पीटर हा ख्रिस्ताच्या १२ शिष्यांपैकी एक आणि पहिला धर्मप्रसारक होता. सन ३२६ मध्ये, सम्राट कॉन्स्टन्टाइनने सेंट पीटरच्या समाधीवर अतिभव्य वास्तू (बाझिलिका) उभारली. एका लांब-रुंद दिवाणखान्यात दुतर्फा उंच खांबांची रांग आणि त्यावर अर्धवर्तुळाकार घुमट अशी त्याची रचना आहे. १६व्या शतकात तिथेच पुनर्बांधणी होऊन, ख्रिस्ती धर्मीयांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू बांधण्यात आली.
‘व्हॅटिकन’ने लोकांना उपयुक्त अशा
सन ६४मध्ये रोमच्या भीषण आगीत असंख्य ख्रिस्ती बांधव मृत्युमुखी पडले. सम्राट नीरोला ख्रिश्चन लोकांबद्दल विलक्षण राग होता. जिथे आग लागली त्याच ‘सर्कस’ भागात सेंट पीटरला क्रूसावर चढवण्यात आले, असे प्राचीन परंपरा सांगते. ‘व्हॅटिकन’च्या परिसरात इसवी सनापूर्वी फारशी वस्ती नव्हती; पण तो भाग पवित्र मानला जात असे. हळूहळू त्याचा विकास होत गेला. सुरुवातीला सुमारे एक हजार वर्षे पोपचे वास्तव्य रोमलगतच्या लॅटरन पॅलेसमध्ये असे. चौदाव्या शतकात तर पोप सुमारे ७० वर्षे पोप फ्रान्समधल्या ‘ॲविग्नन’ गावी राहत असत. १८७०नंतर ‘व्हॅटिकन’ हेच त्यांचे केंद्र झाले. त्या शहराच्या आतील कुठल्याही व्यवहारात (धार्मिक वा अन्य) इटलीने कधीही हस्तक्षेप केला नाही. १९२९मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला मान्यता मिळाली, त्या वेळी इटलीचा भावी हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याने राजाच्या वतीने आणि ‘पोप पायस ११’तर्फे कार्डिनल सेक्रेटरी पिएत्रो गॅस्पारी याने ‘स्वातंत्र्या’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या देशाने ‘तटस्थ’ भूमिका घेतली. जर्मनीसह सर्व फौजांनी ‘व्हॅटिकन’चा आदर करून, तिथले काहीही उद्ध्वस्त केले नाही. युद्ध संपल्यानंतर सन १९४६मध्ये ‘पोप पायस १२’ने नव्या ३२ कार्डिनल्सची नियुक्ती केली.
शहराचा अर्धाअधिक भाग (५७ एकर) बागांनी व्यापलेला आहे. कारंजी आणि सुंदर मूर्ती व पुतळ्यांमुळे त्यांची शोभा वाढलेली आहे. पश्चिम आणि दक्षिण-उत्तर उंच दगडी भिंती उभारलेल्या आहेत. राजसत्तेप्रमाणेच, पोपच्या आधिपत्याखाली राजकीय, व्यवस्थापकीय, कायदा-सुव्यवस्था यांचा कारभार चालतो. ‘व्हॅटिकन’ संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य नाही. सध्या कॅथॉलिक चर्चचे आणि ‘व्हॅटिकन’ देशाचे प्रमुख ‘पोप फ्रान्सिस’ (जन्म १७ डिसेंबर १९३६) हे आहेत.
‘व्हॅटिकन’ इटलीमध्ये स्थित असल्यामुळे इटालियन लष्करातर्फे त्या देशाला संरक्षण पुरवण्यात येते. तसा करार मात्र झालेला नाही. त्या छोट्या देशाकडे
जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा ‘व्हॅटिकन’मध्ये जास्त वाइन रिचवली जाते. एका वर्षात प्रत्येक रहिवासी किमान १०५ बाटल्या वाइन पितो. ‘व्हॅटिकन’ हे कलेचे माहेरघर आहे. सेंट पीटर बाझिलिका उभारण्यात एकाहून एक जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ सहभागी झाले. ब्रामांट, मायकलेंजलो, ज्याकोमो डेल पोर्ता आणि बर्निनी यांनी मध्ययुगीन वास्तुकलेचे आदर्श निर्माण केले. ‘सिस्टीन चॅपेल’ हे भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तिथले छत आणि ‘लास्ट जजमेंट’ यांचा निर्माता मायकलेंजलोच आहे. त्याचे विविध कलांमधील कर्तृत्व इतके अजोड आहे, की त्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. लाकूड, दगड, धातू या माध्यमांमधून त्याने सुंदर कलाकृती बनवल्या आहेत.
|