"व्हायोलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
 
== कसे वाजवितात ==
सारंगी, व्हायोलिन, सनई, बासरी ही वाद्ये गायकी अंगाने वाजविली जातात. गायक गळ्याने गातो, तर वादक बोटाने गातो. गायकाच्या कंठाला (गळ्याला) जे शक्य नाही ते बऱ्याचवेळा वादकाच्या बोटाला शक्य असते. म्हणूनच गायनशैली व वादनशैली यात फरक पडतो. आज व्हायोलिन वादनाच्या मैफलीची एक खास शैली बनू पाहत आहे. रागांची शास्त्रशुद्ध मांडणी, ताल-लय यांचा क्रमबद्ध विकास, याबरोबरच गजकामाच्या कसरती, फिगरिंग बोर्डचा अवांतर वापर, तबल्याबरोबरचे सवाल-जवाब, भन्नाट लयीत पोहोचणारा 'झाल्या'सारखा प्रकार, या सर्व आतषबाजींकडे व्हायोलिनवादनाची मैफल झुकू लागली आहे. भारतातील श्रेष्ठ वादक-कलाकार पंडित [[व्ही. जी. जोग]], उस्ताद [[बिस्मिल्ला खाँखॉं]], पंडित [[सामता प्रसाद]] या त्रिकुटाने व्हायोलिन-सनई-तबला या वाद्यांच्या जुगलबंदीने अफाट लोकप्रियता मिळवली होती.
 
व्हायोलिनचा जो एक मोकळा, दमदार, घुमदार आवाज आहे, तो त्याच्या लाकडी 'बॉडी'मुळे. त्या बॉडीलाच 'ध्वनिपेटिका' असे म्हणतात. हे लाकूड विशिष्ट प्रकारचे असते. आपल्याकडे जसे तंबोऱ्याचे भोपळे पंढरपूर, मिरज या भागातच होतात, तसे व्हायोलिनचे लाकूड युरोपातील विशिष्ट प्रदेशात उपलब्ध होते. म्हणूनच इटालियन व जर्मन बनावटीची व्हायोलिने जगात सर्वोत्तम मानली जातात. या विशिष्ट लाकडापासून बनविलेली व्हायोलिनची ध्वनिपेटिका, त्याचा विशिष्ट आकार, धातूच्या तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त झाला आहे. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनिपेटिकेला कडेने खुंट्यांची सोय केली जाते. त्या वेळेस ध्वनिपेटिकेचे लाकूड दाबले जाते व त्यातून बद्ध व दबलेला आवाज येतो.