"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]ही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या '[[लिनस टोरवाल्ड्स]]'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेअर्स, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेअर, ही '''[[ग्‍नू प्रकल्प|ग्‍नू प्रकल्पाने]]''' विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव [[#'लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स'|ग्‍नू/लिनक्स]] हे आहे. (खालील ''लिनक्स' आणि 'ग्‍नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)
लिनक्स सुरुवातीला [[इंटेल-३८६]] [[मायक्रोप्रोसेसर]]वर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या [[व्यक्तिगत संगणक]], [[महासंगणक]], तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.[[गूगल]] कंपनीची 'अँड्रॉइडॲंड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइडॲंड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. [[आय.बी.एम.]] , [[ह्युलेट-पॅकार्ड|एचपी]], अधिक विकसित करीत आहेत. [[सेवा संगणक]] क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा [[विंडोज]] आणि [[युनिक्स]] यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात.
 
= इतिहास =
[[लिनक्स गाभा]] प्रथम [[फिनलंड|फिनलंडच्या]] [[लिनस टोरवाल्ड्स]] या विद्यार्थ्याने लिहिला. त्याच्याकडे सुरुवातीला [[अँड्रुॲंड्रु टॅनेनबॉम]] यांनी लिहिलेली [[मिनिक्स]] कार्यप्रणाली होती. पण टॅनेनबॉम ती वाढवू इच्छित नव्हते. म्हणून लिनसने त्याला पर्यायी लिनक्स प्रणाली विकसित केली.
 
ज्यावेळी लिनक्सची प्रथम आवृत्ती लिनसने प्रसिद्ध केली त्यावेळी ग्‍नू प्रकल्प बऱ्याच प्रमाणात विकसित झाला होता. संगणक प्रणालीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या भागांपैकी केवळ गाभ्याच्या भागाचे काम पूर्ण व्हायचे होते. लिनक्स गाभ्याच्या प्रोग्रॅमने ही महत्त्वाची गरज पूर्ण केली. त्यामुळे लिनक्स लगेचच नवीन ग्‍नू संगणक प्रणालीचा गाभा म्हणून वापरण्यात आली. लिनक्स ही नंतर [[ग्‍नू सार्वजनिक परवाना|ग्‍नू सार्वजनिक परवान्याच्या]]खाली आणण्यात आली.
ओळ ४९:
= वितरणे =
 
[[लिनक्स वितरण]] हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वतःची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्‍नू'(GPL)साठी दिलेल्या मुक्त परवानग्यांमुळे कोणीही स्वतःचे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरित करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे [[डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डेबिअन]], [[रेड हॅट]], [[उबुंटू]], [[मँड्रिवामॅंड्रिवा]], [[बॉस ऑपरेटिंग सिस्टिम]] इत्यादी आहेत.
 
= विकासासाठी कष्ट =
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले