"रेने देकार्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
'''रेने देकार्त''' (जन्म : ३१ मार्च १५९६; मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०) हा एक अतिशय प्रभावी [[फ्रान्स|फ्रेंच]] तत्त्वज्ञ, [[गणितज्ञ]], शास्त्रज्ञ, लेखक आणि विचारवंत होता. त्याला आधुनिक तत्त्वज्ञानाचा आणि आधुनिक गणिताचा जनक मानले गेले आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात झालेले नंतरचे बरेचसे काम हे देकार्तच्या लिखाणाला प्रतिवाद म्हणून झाल्याचे दिसून येते. त्याच्या लिखाणाचा त्याच्या काळापासून आजपर्यंत खूप बारकाईने अभ्यास केला गेला आहे. देकार्तचा गणितावरील प्रभावही प्रतल-[[भूमिती]]तील व [[बीजगणित]]ातील त्याच्या [[कार्टेशियन गुणक पद्धती]]सारख्या कामांवरून दिसून येतो. कार्टेशियन गुणक पद्धतीचे नामकरण देकार्तच्या नावावरूनच झाले आहे.
 
रेने देकार्तचा दृष्टिकोन बऱ्याच वेळा त्याच्या आधी होऊन गेलेल्या तत्त्वज्ञांपेक्षा बराच वेगळा असल्याचे दिसून येते. ले पॅस्याँसपॅस्यॉंस दे लेम (''Les passions de l'âme'') या आपल्या एका निबंधाच्या प्रस्तावनेत तर देकार्त असे लिहितो की मी या विषयांवर असे लेखन करीन की ''जसे या विषयांवर आत्तापर्यंत कोणीही लिहिले नसेल''.
 
फ्रेंच तत्त्ववेत्ता रेने देकार्त याने लिहिलेला ‘कार्टेशियन मेडिटेशन्स’हा ग्रंथ देकार्तच्या तत्त्वज्ञानाचा शिरोमणी मानला जातो. त्याच्या टायटलमधे जरी मेडिटेशन हा शब्द असला, तरी हा ग्रंथ अध्यात्मावरचा नसून तत्त्वज्ञानावरचा आहे.