"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १७:
 
== जीवनवृत्त ==
[[चित्र:leafydragon.jpg|thumb|200px| मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माशाचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माशाचा जवळ जाणारा आहे. याच्या कल्ल्यांच्या पानासारख्या रूपामुळे हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.]]माशांचे जीवनवृत्त सर्वसाधारणपणे पाण्यातील एकंदर परिस्थितीशी जुळणारे असते. ही परिस्थिती विविध प्रकारची असल्यामुळे जीवनवृत्तातही विविधता आढळते. माशांना बाह्य जननेंद्रिये नसतात. मादी पाण्यात अंडी सोडते व त्याच वेळी तिच्याजवळ असणारा नर अंड्यावर शुक्राणूंचा (पु-जनन पेशींचा) वर्षाव करतो. अंड्याचे निषेचन (फलन) व पुढील विकास पाण्यातच होतो. अंड्यातून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगाणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येण्यास अठरा तासांपासून काही आठवड्यांचा अवधी लागतो. किती अवधी लागावा हे त्या जातीवर व तापमान वगैरेंसारख्या भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते.डिंभाचे रूपांतरण प्रौढात होते. यास लागणारा कालही माशाच्या जातीवर अवलंबून असतो. पुष्कळ माशांत थोडे दिवस पुरतात, तर ईल या माशास ३ किंवा ४ वर्षे व लँप्रीलॅंप्री या माशास पाच वर्षे लागतात. साधारणपणे अंडी निषेचित झाल्यावर तो इतस्ततः वाहत जात असतानाच वाढत असतात व शेवटी डिंभ बाहेर पडतो. स्टिकलबॅक, गुरामी, सयामी फायटर, शिंगाडा इ. माशांत नर किंवा मादी अंड्याची किंवा पिलांची काळजी घेतात. पिसिलीडी व इतर काही मत्स्यकुलांत अंड्याचे निषेचन व गर्भाची वाढ मादीच्या शरीरातच होते व ही मादी अंडी न घालताच पिलांना जन्म देते. या माशांत बाह्य जननेंद्रियेही आढळतात. मुशी, वागळी, पाकट इ. उपास्थिमिनांतही ( ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनलेला असतो अशा माशांतही) अशीच प्रजनन व्यवस्था असते. काही माशांत अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते व पुढची वाढ बाहेर पाण्यात होते. काही थोड्याजाती
 
उभयलिंगी आहेत; परंतु त्यांच्यातील पुं-जनन तंत्र (नरातील जनन संस्था) व स्त्री-जनन तंत्र निरनिराळ्या वेळी पक्व होतात.
ओळ ४३:
माशांच्या प्रकारांमधील [[पापलेट]], [[रावस]], [[सुरमई]], [[बांगडा]], सौंदाळे, [[हलवा (मासे)|हलवा]], घोळ इ. मोठे आणि कमी काटे असलेले मासे. छोटय़ा आणि काटेरी माशांमध्ये करली, भिंगी, पाला (हे तिन्ही मोठे, पण भरपूर काटे असलेले मासे आहेत) तर मांदेली, मोदकं, [[बोंबील]], कांटा, तारली, मुडदुसे, टोकेरी सुळे, बोयटं, पेडवे, निवटे(निवटी), शिंगाडा इत्यादी अनेक प्रकारचे मासे खाल्ले जातात. मोरी / मुशी (शार्कची जात) या माशाला काटे नसून केवळ मध्यभागी मणका असतो, हा पथ्याचा मासा म्हणून बिनधोकपणे खाल्ला जातो.
 
पापलेट, बांगडा, सुरमई, रावस, मोरी, हलवा यांची सर्वसाधारणपणे मोठय़ा माशांमध्ये गणना होते. तर सौंदाळे, मुडदुशी (नगली), [[बोंबील]], मांदेली, वेरल्या, शेवटे, धोडय़ारे असे मासे छोटय़ा माशांमध्ये मोडतात. याशिवाय कुल्र्या, तिसऱ्या, खडपी कालवे, कोलंबी अशा प्रकारचे मासेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. त्यापकी प्रत्येक माशाचे स्वत:चेस्वतःचे गुणधर्म असतात. उदाहरण द्यायचे झाले तर खोल समुद्रात मिळणारे मोठे मासे (डीप सी फिश) हे सर्वसाधारणपणे अधिक बल देणारे अर्थात् बल्य असतात. उदा. रावस, हलवा, सुरमई. परंतु हे मासे पचायला जड असतात,
 
{| class="wikitable sortable"
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले