"माक्स म्युलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
[[इ.स. १८४९]]<nowiki/>च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली [[ऋग्वेद]]ाची संशोधित व प्रमाणित [[देवनागरी]] प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]]ाने प्रकाशित केली.
 
१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं [[स्ट्रासबर्ग विद्यापीठ]]ात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचेकॉंग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना [[इंग्लंड]]<nowiki/>च्या [[प्रिव्ही काउन्सिल]]<nowiki/>वर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले.
 
तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती.