कुशल प्रशासनावर सर्वप्रथम बिंबिसारने जोर दिला. बिंबिसार स्वत:स्वतः शासनाच्या समस्यांमध्ये रूची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मध्ये सांगितले आढळले. पुराणांनुसार बिंबिसाराने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केलेले आहे.