"बेलग्रेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली बेलग्रेडमध्ये अनेक ओस्मानी वास्तुशास्त्राच्या इमारती उभ्या राहिल्या. पुढील काळात [[कॉन्स्टेन्टिनोपल]] खालोखाल बेलग्रेड युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे ओस्मानी शहर बनले. १७व्या व १८व्या शतकात [[पवित्र रोमन साम्राज्य]]ाने बेलग्रेडवर कब्जा करण्याचे तीन प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी ओस्मान्यांनी बेलग्रेडवरचा ताबा राखला. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू झालेला सर्बियन स्वातंत्र्यलढा अनेक दशके सुरू होता व अखेर १८८२ साली सर्बियाच्या राजतंत्राची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर बेलग्रेडचे सर्बियाची राजधानी म्हणून महत्त्व अधिकच वाढले व शहराचा विकास होत गेला.
 
[[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]ने २८ जुलै १९१४ रोजी सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. पुढील एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या लढाईमध्ये बहुतेक सर्व बेलग्रेड शहर बेचिराख झाले व अखेर ९ ऑक्टोबर १९१५ रोजी [[जर्मन साम्राज्य|जर्मन]] व ऑस्ट्रो-हंगेरीयन सैन्याने बेलग्रेडवर कब्जा केला. १ नोव्हेंबर १९१८ रोजी [[फ्रान्स|फ्रेंच]] सैन्याने बेलग्रेडची मुक्तता केली. १९१८ सालच्या [[युगोस्लाव्हिया]] देशाच्या निर्मितीपासून बेलग्रेड युगोस्लाव्हियाची राजधानी राहिली आहे. ह्यांमध्ये [[युगोस्लाव्हियाचे राजतंत्र]] (१९१८ - १९४१), [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]] (१९४५ - १९९२), [[युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक]] (१९९२ - २००३) व [[सर्बिया आणि माँटेनिग्रोमॉंटेनिग्रो]] (२००३ - २००६) ह्या चार वेगवेगळ्या देशांचा समावेश होता.
[[चित्र:NATO damage in Belgrade.jpg|इवलेसे|नाटो हल्ल्यामध्ये पडझड झालेली एक इमारत]]
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] प्रथम [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांच्या]] बाजूने सहभागी होणाऱ्या युगोस्लाव्हियामध्ये राजकीय बंड घडले व नव्या शासनाने [[नाझी जर्मनी]]सोबत संलग्न होण्यास नकार दिला. ६ एप्रिल १९४१ रोजी [[लुफ्तवाफे]]ने बेलग्रेडवर अनेक बाँबहल्लेबॉंबहल्ले केले व १३ एप्रिल १९४१ रोजी जर्मनीने बेलग्रेड काबीज केले. नाझी काळात अनेक स्थानिक लोकांना ठार केले गेले. [[रॉटरडॅम]]प्रमाणे बेलग्रेडवर देखील ह्या महायुद्धात दोनवेळा बाँबहल्लेबॉंबहल्ले केले गेले: प्रथम अक्ष राष्ट्रांकडून व नंतर [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांकडून]]. २० ऑक्टोबर १९४४ रोजी [[लाल सैन्य]]ाने बेलग्रेडची सुटका केली. युद्धानंतर पुन्हा एकदा बेलग्रेडची जोमाने पुनर्बंधणी करण्यात आली. १९६२ साली येथील [[बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ|विमानतळ]] बांधण्यात आला. २००६ साली सर्बिया व माँटेनिग्रोमॉंटेनिग्रो वेगळे झाल्यानंतर बेलग्रेड सर्बियाची राजधानी बनली. १९९० च्या दशकात युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर झालेल्या [[कोसोव्हो युद्ध]]ादरम्यान [[नाटो]]ने बेलग्रेडवर मोठा बाँबहल्लाबॉंबहल्ला केला. ह्या हल्ल्यात बेलग्रेडचे पुन्हा नुकसान झाले.
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलग्रेड" पासून हुडकले