"बाबूराव पेंटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३४:
 
==चित्रपट ==
आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी [[कॅमेरा]] तयार केला. त्याचबरोबर [[छपाई यंत्र]], डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी [[महाराष्ट्र फिल्म कंपनी]]ची स्थापना केली. स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे ‘सैरंध्री’. पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील [[भीम]] व [[कीचक]] यांच्या [[द्वंद्वयुद्ध|द्वंद्वयुद्धाचे]] दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय [[दिग्दर्शक]] होते. त्यांच्या कंपनीमधून [[मद्रास]]चे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील [[व्ही. शांताराम]], दामले, फत्तेलाल, धायबर, [[बाबुराव पेंढारकर]], [[मा. विनायक]], नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, [[पृथ्वीराज कपूर]], झेबुन्निसा, [[ललिता पवार]] असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने [[भारतीय चित्रपटसृष्टी]]ला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ [[मूकपट]] निर्माण केले. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लँपलॅंप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला [[भारतीय चित्रपट]] होय. [[पन्हाळा]] किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरतो. याच चित्रपटाच्या वेळी [[मुंबई]]ला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच [[करमणूक कर]] बसविण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी [[शिलामुद्रण]] केलेली ३.४८ x ६.९६ मीटर (१॰ x २॰ फूट) लांबी-रुदीची [[भित्तिपत्रके]] तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तिपत्रकांचे जनकत्व बाबूरावांकडेच जाते.
==अडचणी==
वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेयाचे चित्रीकरण सुरू केले; परंतु ६नोव्हेंबर १९२२रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला एकाएकी आग लागून त्याची राखरांगोळी झाली; तथापि त्या राखेतूनही पुनश्च आपला चित्रपटसंसार बाबूरावांनी उभा केला व [[चित्रपटनिर्मिती]] सुरूच ठेवली. त्याकाळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपटसंस्था मानली जाई. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने कालोचित ठरणारी [[वेशभूषा]] व वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती. असे असले, तरी त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक असे. त्यामुळेच त्या काळी मूकपटातील उपशीर्षके प्राय: हिंदीतून देण्यात येत असली, तरी बाबूरावांना हे फारसे पसंत नसे.
ओळ ४२:
बाबूरांवांच्या चित्रकलेवर वॅट्स, रॉझेटी, बर्न्स व लॅडशियर इ. पाश्चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. त्रिंदाद, आगासकर, नागेशकर, पत्रावळे व हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्रे ते अभ्यासत व आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत.
==शिल्पकला==
शिल्पकलेत मृद्-शिल्पांपासून ते [[ब्राँझब्रॉंझ]]च्या ओतकामापर्यंतची सर्व कामे ते स्वतःच करीत. नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची ओतशाळाही उभारली होती. त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.
 
==पुरस्कार==