"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
 
==संस्कृती==
प्रणय हा शब्द भारतीय संस्कृतीत अगदी व्यक्तीचे नाव या विशेषनाम स्वरूपातही येतो. शान्तिसूक्ते झाल्यानंतर अथर्ववेदात प्रणयसूक्ते आहेत. पतिपत्नीचे ऎक्यऐक्य कसे राहील, कोणत्या रूपात राहील, पती - पत्नी एकमेकांचे दोष कमी कसे करतील आणि गुण कसे वाढवतील ह्याची चर्चा आणि चित्रण प्रणयमंत्रात आहे. पतीपत्नी एकजीव असली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे, काय अपेक्षित आहे ह्याचेही वर्णन अथर्ववेदात आहे.<ref>google's cache of {{Webarchiv | url=http://geetaadhyay15.blogspot.com/ | wayback=20120307163908 | text=}}. It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 05:41:41 GMT</ref>
 
ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचाही निषेध केला आहे. प्राचीन साहित्यात प्रणयाची भरपूर वर्णने आढळतात. श्रीकृष्ण राधेचा प्रणयातील निर्मळपणा समाजाला आणि धर्माने मान्य होता.[[गाथा सप्तशती]]च्या लोकसाहित्य गाथातून महाराष्ट्रीय जीवनातील प्रणयाची वर्णने आढळतात. आदी शंकराचार्यांनी वादविवादात प्रणयासंदर्भातील भारतीय सनातन धर्मीय भूमिकेची मांडणी केली. मध्ययुगीन काळात भक्तिरसाकरिता प्रणयाची उदाहरणे संतवचनांमध्ये आढळतात.
ओळ २५:
१९५०च्या दशकात ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुषतुलना या ग्रंथातून स्त्रियांसमोरील प्रश्न परखडपणे मांडले. विभावरी शिरूरकर यांचा कळ्यांचे निःश्वास हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्या लेखनाला स्त्रीचे खरे सत्त्व सापडलेले आढळून येते. कळ्यांचे निःश्वास कथासंग्रहातील हिंदोळ्यावर या कथेची नायिका या व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रखर जाणीवांचा आविष्कार करते. व्यक्तिस्वातंत्र्य + वास्तववाद अशा प्रेरणा एकत्रित जागृत होऊन विभावरीबाई स्त्रीविश्वाचे खरेखुरे दर्शन घडविण्याकडे वळल्या.
 
भारतीय वाडमयानेवाङ्मयाने आणि भारतीय चित्रपट सृष्टीनेसुद्धा प्रणय हा विषय २०व्या शतकात समाजासमोर अधिक मोकळेपणाने मांडण्यास सुरुवात केली. त्याला स्वातंत्र्योत्तर काळात व्यक्तिस्वातंत्र्यविषयक कायद्याचे पाठबळही मिळत गेले.
 
१९६०च्या दशकानंतर समाजजीवनावर पाश्चात्त्य विचारसरणीचा हळूहळू परिणाम होऊन अधिक मोकळेपणा येत असल्याचे आढळून येते. तर स्वतःस [[संस्कृती रक्षक]] म्हणवणाऱ्यांकडून [[पाश्चिमात्त्यीकरण|पाश्चिमात्तयीकरणाच्या]] विरोधाच्या निमित्ताने [[व्हॅलेन्टाईन्स डे]]ला विरोधही होतो. त्याऐवजी [[वसंत पंचमी]] हा प्रणयदिन म्हणून साजरा करावा असे त्यांचे आवाहन असते. दुसरीकडे सिनेदिग्दर्शक [[अमोल पालेकर]] आणि [[वंदना खरे]] यांनी मराठी चित्रपटात आणि रंगभूमीवरील प्रणय विषय अधिक मुक्तपणे हाताळण्यास आरंभ केला असे आढळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले