"पोपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
पोपट संघचारी (गटाने एकत्र राहणारे) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत. त्यांचा आवाज कर्कश, किंचाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो; परंतु पाळून शिकविल्यानंतर यांच्या कित्येक जाती माणसासारखे शब्दोच्चार करु शकतात इतकेच नव्हे, तर दोनचार वाक्ये बोलू शकतात. यामुळे पुष्कळ लोक पोपट पाळतात. आफ्रिकेतील काही जातींचे पोपट (उदा., सिटॅकस एरिथॅकस) फार स्पष्ट शब्दोच्चार करतात. इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात. पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. काही पोपट ८० वर्षे जगल्याचीही नोंद आहे.
 
सिटॅकोसिस हा व्हायरसजन्य रोग पोपटामुळे माणसाला होतो व त्यामुळे बरेच लोक पोपट पाळण्यास नाखूश झाले होते. हा रोग फक्त पोपटांनाच होतो असा पूर्वी समज होता; पण तो इतर पाळीव पक्ष्यांनाही होतो असे आता आढळून आले आहे. प्रतिजैव (अँटिबायॉटिकॲंटिबायॉटिक) औषधांच्या शोधांमुळे या रोगांचा प्रतिबंध झाल्याने पोपटाची लोकप्रियता पुन्हा वाढीस लागली आहे.
 
बजरीगार हा छोटा ऑस्ट्रेलियन पोपट जगातील सर्व देशांच्या बाजारांत थोड्या किंमतीला विकत मिळतो. पुष्कळ लोक या छोट्या गोजिरवाण्या पक्ष्यांची जोडपी पिंजऱ्यात पाळतात. बंदिवासात देखील याची वीण होत असल्यामुळे माणसाने याचा फायदा घेऊन अनेक रंगांच्या बजरीगारांची निपज केली आहे. या पक्ष्यांचा रानटी अवस्थेतील मूळ रंग गवती हिरवा असतो; पण हल्ली बाजारात गडद हिरवा, करडा, पिवळा, पांढरा, निळा, जांभळा इ. रंगांचे बजरीगार वाटेल तितके मिळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोपट" पासून हुडकले