"पलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अधिक माहीती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६२:
==इतिहास==
[[File:Tamil Inscriptions Pazhani.jpg|thumb|left|पळणी मंदिरातील तामिळ शिलालेख]]
प्राचीन तामिळ धार्मिक ग्रंथांमध्ये या स्थानाचा संदर्भ आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार, नारद ऋषी एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव यांच्या आकाशातील दरबारात गेले आणि ज्ञान-पाझम (शब्दशः ज्ञानाचे फळ), ज्यामध्ये बुद्धीचे अमृत होते, ते त्यांना अर्पण केले. भगवान शिव यांनी ते फळ आपल्या दोन मुलांमध्ये, गणेश आणि मुरुगा, यांना विभाजून देण्याचा हेतू व्यक्त केला तेव्हा नारदांनी ते फळ न कापण्याचा सल्ला दिला. शंकरांनी त्याच्या दोन मुलांपैकी जो कोणी सर्वप्रथम तीनदा जग परिभ्रमण करेल त्याला ते फळ देण्याचे ठरविले. हे आव्हान स्वीकारून मुरुगा यांनी आपले वाहन मोर यावर बसून जग परिभ्रमणाचा प्रवास सुरु केला. तथापि, गणेशाने त्यांचे जग हे त्यांचे पालक शिव आणि पार्वती यांच्यातच सामावलेले आहे असे सांगून त्यांचीच परिक्रमा केली. <ref>{{cite web|title=Dhandapani Murugan Kovil|url=http://tamilnadu.com/temples/dhandapani-murugan-kovil.html|website=tamilnadu.com|publisher=General Interactive, LLC|accessdate=28 January 2017|url-status=dead|archiveurl=https://web.archive.org/web/20130307142728/http://tamilnadu.com/temples/dhandapani-murugan-kovil.html|archivedate=7 March 2013|df=dmy-all}}</ref> गणेशाच्या या विवेकबुद्धीने प्रसन्न होऊन भगवान शिवने हे फळ त्याला दिले. जेव्हा मुरुगा परत आला, तेव्हा त्याचे प्रयत्न व्यर्थ गेलेले ऐकून त्याला राग आला. त्यांनी कैलास सोडले व दक्षिण भारतातील पलानी डोंगरावर त्यांचे वास्तव्य हलवले. असे मानले जाते की मुरुगाला बालपणापासूनच परिपक्व होण्याची गरज भासू लागली आणि म्हणूनच त्याने एकांतात राहणे पसंत केले आणि त्याने आपली सर्व वस्त्रे व दागिने यांचा त्याग केला. स्वत:लास्वतःला समजून घेण्यासाठी ते ध्यान मग्न झाले.
पलानी आणि बहुतेक दिंडुक्कल जिल्हा हा तामिळ देशातील कोंगू नाडू भाग होता. पलानी व ओडदानच्राम तालुक्यांचा उत्तरी भाग हा अंदू नाडू उप-प्रांताचा भाग असल्याचे मानले जाते, तर उर्वरित भाग वैयापुरी नाडूचा होता. हा सर्व परिसर कोईंबतूर आणि मदुराईच्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. १८ व्या शतकात, हैदर अली आणि त्याचा मुलगा, टिपू सुलतान याने येथे राज्य केले. तिसऱ्या एंग्लो-म्हैसूर युद्धानंतर येथे इंग्रजांनी राज्य केले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पलानी" पासून हुडकले