"परिभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर ती ज्ञानभाषा झाली पाहिजे व परिभाषेच्या सहाय्याने शब्दसंपत्ती वाढविली पाहिजे. ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच भाषा ज्ञानाची भाषा होऊ शकते. आज आपल्या भाषेचा अभिमान असतानाही एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधनाचे काम करणा-या इंग्रजी सारख्या ज्या भाषा आहेत, त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. जगामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात होणा-या प्रगतीशी संबंध ठेवायचा असतो अशांना त्या भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता वाटते. याचे कारण या क्षेत्रातील मूलभूत संशोधनाचे काम या भाषेमधून होत असते. मराठी भाषेबद्दलचा आपला अभिमान ख-या अर्थाने पहिल्या प्रतीचा राहणार असेल तर हे काम मराठी भाषेमध्येही त्वरीत झाले पाहिजे. तथा प्रकारची परिस्थिती आपल्याला येथे निर्माण करणे शक्य आहे ही भावना आपल्या समस्त लेखक, साहित्यिक मंडळींच्या मनापर्यंत जर जाऊन पोहोचली तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल.
रशिया, चीन, जपान इ. विकसनशील देश स्वत:च्यास्वतःच्या भाषांमधून मूलभूत संशोधन पूर्वीपासूनच करत आहेत. त्यांचे इंग्रजीशिवाय चालते, जपानसारख्या अतिशय छोटा देश जगाच्या बाजारपेठेवर राज्य करतो आहे. तरा आपला हा खंडप्राय असलेला देश का करू शकणार नाही ? आपणही हे निश्चित करू शकतो, त्यासाठी आपण आपल्या प्रादेशिक भाषा समृद्ध करू शकतो. इतर भाषांमध्ये वाङमय संशोधन जसे मराठीमध्ये येण्याची आवश्यकता आहे, तसे मराठीतील वाङमय देखील अन्य भाषांमध्ये जाण्याची गरज आहे. उत्तम ग्रंथांचे भाषांतर शासनामार्फत तसेच इतर संस्था व्यक्ति यांच्यामार्फत केले गेले पाहिजे त्यासाठी लागणारे नवीन शब्द परिभाषेच्या सहाय्याने सतत तयार करत राहिले पाहिजे.{{संदर्भ हवा}}
 
==पारिभाषिक संज्ञा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/परिभाषा" पासून हुडकले