"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५३:
 
===[[तिथी]]चा क्षय व वृद्धी===
पंचांगात एखादी [[तिथी]] पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या [[तिथी]] कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी [[तिथी]] असते ती त्या दिवसाची [[तिथी]]म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी [[तिथी]] सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या [[तिथी]]चा [[क्षय]] झाला असे समजतात. [[तिथी]]चा क्षय म्हणजे ती [[तिथI]] आलीच नाही असा होत नाही. प्रत्येक [[तिथी]] १९ ते २६ तासांकरता येतेच. (तिथिलोपाचे उदाहरण : रविवारी ६:३२ ला सूर्योदय. तेव्हा नवमी आहे, म्हणून त्या पूर्ण दिवसाची नवमीशी सांगड. मग ६:५० ला दशमी सुरू होते, आणि ती सोमवारी पहाटे ५:१० ला संपून एकादशी सुरू होते. सोमवारी ६:३४ ला सूर्योदय होतो, तेव्हा एकादशी. अशा प्रकारे दशमीचा क्षय वा लोप होतो.) तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू असलेली [[तिथी]] दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती [[तिथी]] पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते. वृद्धीचे उदाहरण : रविवारी पहाटे ५:४२ अष्टमीची सुरुवात, आणि ६:०८ चा सूर्योदय. सोमवारी ६:०९ चा सूर्योदय, तेव्हा अष्टमी, म्हणून त्या पूर्ण दिवसाची सागड परत अष्टमीशीच. सोमवारी सूर्योदयानंतर ७:१५ ला अष्टमी समाप्त. म्हणजे अष्टमी लागॊपाठलागोपाठ दोन दिवस आली, म्हणजे तिची वृद्धी झाली. चन्द्राच्या पृथ्वीपासून कमी-अधिक अन्तरानुसार केपलरच्या सूत्रानुसार (Kepler's Law) तिथीचा काल १९ ते २६ तास असल्यामुळे या घटना घडतात. एका रोमन तारखेला तीन तिथ्या येऊ शकतात, अनेकदा येतात. आणि एका [[तिथी]]ला तीन तारखा शक्य असतात, आणि अनेकदा हा प्रकारही होतो.
 
==तिथींचे प्रकार==
ओळ १०३:
* श्रावण (हिंदीत सावन) : संस्कृतमध्ये नभस् सुद्धा. (पौर्णिमेला श्रावणी)
* भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा) (संस्कृतमधील आणखीचे शब्द - प्रौष्ठपद, नभस्य)
* आश्विन (गुजरातीत आसो, संस्कृतमध्ये आश्वयुज्, इष; हिंदीत कुआर, क्वाँरक्वॉंर) (पौर्णिमेला आश्विनी)
* कार्तिक (गुजराती कारतक) (संस्कृतमध्ये ऊर्ज, बाहुल हे जास्तीचे शब्द) (पौर्णिमेला आणि शुक्ल एकादशीला कार्तिकी)
* मार्गशीर्ष (हिंदीत अगहन; गुजरातीत मागशर) (संस्कृतमध्ये सहस् आणि आग्रहायण)
ओळ १४९:
# तीर (३१ दिवस)
# अमरदाद (३१ दिवस)
# शॆहरेवारशेहरेवार (३१ दिवस)
# मेहेर (३० दिवस)
# आबान (३० दिवस)
ओळ १५९:
# तीर
# अमरदाद
# शेहरेवार
# शॆहरेवार
# मेहेर
# आबान
ओळ ४१३:
 
==मराठी पंचांग छापायची सुरुवात==
शके १९३८मध्ये (इ.स. २०१६) या वर्षी छापील पंचांगाचा शतकोत्तर अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पूर्वी छपाईची कला उपलब्ध नसल्याने पंचांगे ही हस्तलिखित तयार करून त्यातील माहिती तोंडीच सर्वाना करून दिली जात असे. छापील साहित्याला तत्कालीन कर्मठ लोक -शाईत प्राण्यांची चरबी मिसळलेली असते- हे कारण देऊन हातही लावत नसत. अशा काळात धर्माशी संबधित साहित्य उत्तम व सुबकपणे छापले तर ते अशा धर्ममार्तंडाच्या हातात घेतले जाऊन हळूहळू गैरसमज निवळेल असा दूरगामी विचार गणपत कृष्णाजी या मराठी माणसाने केला. हे क्रांतिकारक तंत्रज्ञान रुढ करण्यासाठी पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यानी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वत:च्यास्वतःच्या अक्षरात लिहिले होते. त्या पहिल्या छापील पंचांगाचे गणित रखमाजी देवजी मुले यांनी केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.loksatta.com/mumbai-news/ganpat-krishnaji-made-marathi-first-panchang-1219839/ |शीर्षक=मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे कर्ते दुर्लक्षितच
|publisher= लोकसत्ता दैनिक |date=२७ मार्च, इ.स. २०१६}}
</ref> छापील पंचांगाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त २०१६ सालच्या या नूतन शकवर्षात 'पंचांग' या विषयावर दा.कृ. सोमण हे पंच्याहत्तर व्याख्याने देणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.loksatta.com/thane-news/gudi-padva-twice-in-new-year-1223570/ |शीर्षक= शालिवाहन शक १९३८ या नववर्षांत दोनदा गुढी पाडवा |publisher= लोकसत्ता दैनिक |date=६ एप्रिल, इ.स. २०१६}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले