"जॉर्ज फर्नांडिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
 
==राजकीय कारकीर्द==
जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम [[इ.स. १९६७]] मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचेकॉंग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते [[स.का.पाटिल]] यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र [[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी [[इ.स. १९७४]] मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. [[इ.स. १९७७]] साली [[मोरारजी देसाई]] यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी [[उद्योगमंत्री]] म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेसकॉंग्रेस नेते [[यशवंतराव चव्हाण]] यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.
[[इ.स. १९८४]] च्या निवडणुकीत त्यांचा [[मंगलोर]] लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण [[इ.स. १९८९]] मध्ये ते [[बिहार]] राज्यातील [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले.[[विश्वनाथ प्रताप सिंह]] यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या [[संयुक्त आघाडी]] सरकारमध्ये ते [[रेल्वेमंत्री]] होते. [[इ.स. १९९१]] च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.