"जॉनी लिव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४५:
फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचे
 
पुढे जॉनी बसस्टँडवरबसस्टॅंडवर फेरीवाला म्हणून करू लागला. तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करत करत व्यवसाय करीत असे. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. नंतर १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळाले- स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसेकेल्यावर जॉनीलाजाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तर्‍हे-तर्‍हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. मग त्याला कंपनीत जरा कमी कष्टाचे काम मिळू लागले
 
दुपारच्या वेळात नकला करून जॉनी मित्रांना हसवायच. एकदा तो कंपनीच्या आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होते व कामगारमित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.