"जिम कॉर्बेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
'''जिम कॉर्बेट''' ([[इ.स. १८७५]]-[[इ.स. १९५५]]) हे नरभक्षक [[वाघ]] व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.
 
एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म [[जुलै २५]], [[इ.स. १८७५]] रोजी [[हिमालय|हिमालयाच्या]] कुमाऊँकुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या [[नैनिताल]] (सध्याचे [[उत्तराखंड]] राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले.
 
जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली.