"जाहिरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
 
== वृत्तपत्रातील जाहिरातीचे स्वरूप ==
ह्या तोट्यातल्या आवृत्त्या का चालवल्या जातात? तर उत्तर पुन्हा- जाहिराती..! एखाद्या क्लायंटला आपल्या उत्पादनासाठी पूर्ण देशभर कँपेनकॅंपेन करायची असेल, तर सर्वत्र 'प्रेझेन्स' असलेलेच वृत्तपत्र तो निवडेल, हे सरळ आहे. अशा नॅशनल कँपेन्सकॅंपेन्स म्हणजे अक्षरशः 'क्रीम' असते. एखाद्या मोठ्या ब्रँडचीब्रॅंडची '''जाहिरात''' वृत्तपत्रात येण्यामुळे लोकांच्या मनातली त्या वृत्तपत्राची असलेली प्रतिमा झटक्यात बदलून टाकू शकते. १ कोटी रुपये मिळविण्यासाठी १०० छोट्या ग्राहकांशी डोकेफोड करण्यापेक्षा एकाच, प्रचंड इमेज असलेल्या क्लायंटची जाहिरात करणे हे कितीतरी सोपे. मग अशा नॅशनल कँपेन्सकॅंपेन्स मिळविण्यासाठी काय वाटेल ते केले जाते. भरमसाठ डिस्काउंट आणि सढळ हाताने 'एडिटोरियल सपोर्ट' या गोष्टी मग सहजच होतात.
==जाहिरातीचे प्रकार==
१- भौगोलिक व्याप्तीच्या आधारे जाहिरातीचे प्रकार.
ओळ २५:
 
== जाहिरातीचे बदल ==
लोकांच्या वाचण्याच्या सवयी बदलण्याबरोबरच तिथल्या जाहिराती देणाऱ्या ग्राहकांची [[मानसिकता]] बदलणे हे एक मोठे आव्हान असते. मग अशा वेळी राष्ट्रीय पातळीवरच्या ग्राहकांच्या जाहिराती मदतीस धावून येतात. हे वृत्तपत्र मोठे आहे असा समज / भास निर्माण करण्यात या नॅशनल कँपेन्सचाकॅंपेन्सचा भरपूर वाटा असतो. स्थानिक जाहिराती मग आपोआपच चालून येतात.
 
स्थानिक, जुन्या वृत्तपत्रांना अशा आक्रमक समूहांना तोंड देणे मग कठीण होऊन बसते. दुसऱ्या ठिकाणी जाऊन धंदा, खप वाढविणे; किंवा आवरते घेऊन आपले वृत्तपत्र एखाद्या मोठ्या समूहाला विकणे असेच पर्याय त्यांच्यासमोर राहतात. उदाहरणादाखल, पुण्याचाच विचार केल्यास, २-३ वर्षांपूर्वी सकाळ ग्रुपने विकत घेतलेला 'महाराष्ट्र हेराल्ड' हे ताजे उदाहरण. टाईम्स, एक्सप्रेस अन डीएनएसारख्या आक्रमक समूहांना या जुन्या वृत्तपत्राने कसे तोंड दिले असते? विश्वास ठेवून असलेल्या खूप जुन्या, 'लॉयल' ग्राहकांवर किती दिवस गुजराण करणार?
ओळ ४५:
 
==पैसे पुरवून घेतलेले संपादकीय (पेड एडिटोरियल)==
लोकांच्या या विश्वासाचा फायदा प्रकाशनाने घ्यायचा ठरवला, तर ते नैतिक, की अनैतिक? याची उत्तरे अनेक मिळतील, परंतु धंदा मिळवण्यासाठी / वाढवण्यासाठी 'माफक' फायदा घेतला पाहिजे असा विचार करणारीही वृत्तपत्रे आहेतच. मग सुरू होते 'पेड एडिटोरियल', म्हणजे 'विकतचे संपादकीय / बातमी'. म्हणजे सरळ सरळ व्यवहार. 'गिव्ह अँडॲंड टेकचा'. टाईमसच्या वेगवेगळ्या पानांची / फीचर्सची 'पेड एडिटिरियल्स' ची चक्क 'रेटकार्डे' आहेत. आता बोला!!
 
आता या बातम्यांत कोणाला रस असेल? -असा प्रश्न येणे साहजिक आहे. पण पेपर घेतला, की शब्द न शब्द वाचून काढणारे लोक आहेतच. टाईम्समधले लाईफस्टाईल, ड्रिम होम्स, क्लासिक इंटेरियर्स, टाईम्स प्रॉपर्टी इ. मधले आपण अतिशय गांभीर्याने वाचत असलेले आर्टिकल चक्क 'स्पॉन्सर्ड' आहे, पैसे घेऊन छापले गेले आहे, हे आपल्या गावीही नसते!
ओळ ५२:
 
१) दर गुरूवारी सकाळमध्ये 'हेल्थमंत्र' नावाची पुरवणी येते. यात हेल्थ-ब्युटी संदर्भातल्या उत्पादनांच्या जाहिराती अपेक्षित आहेत. ज्यांना ६, १२, २५, किंवा वर्षभर जाहिराती हव्या आहेत, त्यांना डिस्काउंट स्कीम्सही आहेत. त्याशिवाय 'राईटअप सपोर्ट' किंवा 'फ्री एडिटोरियल' सपोर्टही आहे. समजा 'माया परांजपें'ची ब्युटिक ही संस्था माझी क्लायंट आहे. ब्युटिकच्या कॉस्मेटिक विभागाची २-३ डझनांच्या वर उत्पादने आहेत. आता ६ बाय ८ सेमी इतक्या छोट्या जाहिरातीत त्या उत्पादनाचा फोटो, नाव, एखादी पंचलाईन एवढेच बसू शकते. मग हे उत्पादन कसे वापरावे, व इतर माहिती त्याच पानावर साधारण ६ बाय ८ सेमी च्या बातमी / आर्टिकल मध्ये लिहिली जाते. आम्ही वर्षाला २० लाखांच्या जाहिराती देत असू, तर हा सपोर्ट आम्हाला मिळायला हवा, असे क्लायंटचे म्हणणे असते, आणि ते मान्यही केले जाते.
आता हे असले कोण वाचेल, असे आपल्याला वाटते. पण खाली 'माया परांजपे' हे नाव वाचून काय लिहिले आहे ते उत्सुकतेने वाचणारे अनेक स्त्री-वाचक आहेत. (साप्ताहिक सकाळ किंवा लोकप्रभा मधला 'मायेचा सल्ला' वाचता का? बातमी / आर्टिकल आहे, असे भासवून केलेली (खर्चिक) जाहिरात!) जाहिरात बघून नाही, पण ही माहिती वाचून ती उत्पादने खपल्याची अनंत उदाहरणे आहेत. मग काय.. अधिक माहिती मिळाल्यामुळे वाचक खुष. उत्पादन खपल्यामुळे क्लायंट खुष. रेव्हेन्यू मिळाल्यामुळे प्रकाशन खुष. असा सारा 'गिव्ह अँडॲंड टेक'चा मामला..!!
 
२) तीच गोष्ट 'एज्युमंत्र' ची. एखादी अ‍ॅनिमेशन शिकविणारी संस्था वर्षभर जाहिराती करते. अन त्याच संस्थेचा डायरेक्टर 'अ‍ॅनिमेशन फील्ड' मधले भविष्य / करिअर' या विषयावर लेख लिहून पाठवतो. जाहिरात असलेल्याच पानावर ते छापले जातात. यातून विद्यार्थ्यांना 'अधिक' माहिती मिळते, हे तर खरेच. अन त्या संस्थेत मग जास्त संख्येने अ‍ॅडमिशन्स होतात, हे त्याहूनही खरे!
 
रविवार पुरवण्यांमध्ये देश-परदेशातल्या सहलींची आणि प्रेक्षणीय स्थळाची वाचायला मिळते. ते 'लेख' असतात, अशी अजूनही अनेकांची कल्पना आहे. 'केसरी' (टूर्स) च्या वीणा पाटलांनी जाहिरातीचा हा अभिनव फॉर्म मराठी वृत्तपत्रांत चालू केला. त्याआधीही असे प्रकार होत होतेच. परंतु कमी प्रमाणात. वाचकांना माहिती देऊन 'गुडविल' कमवायचे, की धंदा, अन पैसे आपोआपच चालत येणार, हा सरळ हिशेब. हा लेख-कम-कॉलम-कम-जाहिरात वर्तमानपत्राच्या मुळ फाँटचाचफॉंटचाच प्रकार अन साईझ वापरून केला जातो. हे संपादकीय आर्टिकल आहे, असे भासविण्यासाठी. पण अशा लेखांच्या सर्वांत खाली कोपऱ्यात advt असे बारीक अक्षरांत छापण्याचे बंधन आधी होते. जेणेकरून त्या लेखातली मते व विषयांशी वर्तमानपत्राचे धोरण जोडले जाऊ नये. आताही काही मराठी वृत्तपत्रांत असे advt दिसते कोपऱ्यात. पण एकूणच फारसे सोवळे-ओवळे पाळले जात नाही आजकाल त्याबद्दल.
 
पुण्यातल्या वेज रेस्टॉरंट्सना जाहिरातीची गरज नसते. संध्याकाळ झाली, की लोकच वाट बघत, नंबर यायची वाट बघत दाराशी उभे राहतात. त्यामुळे हा क्लास जाहिरातींमध्ये ओढण्यासाठी आक्रमक प्रकाशनांनी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. जाहिरातींमध्ये भरमसाठ स्कीम्स अन डिस्काऊंट्स तर दिलेच, शिवाय, स्पेशल थाली व डिशेस, हॉटेलमधले नम्र व प्रसन्न वातावरण.. इ. ची माहिती लेखांमधून छापायला सुरूवात केली. आता, खवैय्याला काय घेणे आहे, ही माहिती कुठून अन कशी मिळाली ते? अमूक पेपरमध्ये तुमच्या या डिशबद्दल वाचले, असे जेव्हा तो हॉटेलमालकाला सांगायला जातो, तेव्हा तो मालकही, 'हा, हा. इतके पैसे खर्च केले होते बघा, त्या आर्टिकलसाठी!' अशी फुशारकी मारून सांगतो.
ओळ ६४:
जाहिरात हा माहितीचा अविभाज्य भाग होऊ लागला आहे. जाहिरातीच्या या बदलत्या फॉर्म्सबद्दल त्या करणाऱ्यांची तक्रार नाही, वाचणाऱ्या-बघणाऱ्यांचीही नाही. छापणाऱ्यांनीच का करावी मग?
 
कुणी कुठपर्यंत मजल मारावी, अँडॲंड अ‍ॅट व्हाट कॉस्ट, एवढाच फक्त प्रश्न. पण तो 'एवढाच' नाही. त्यावर रणकंदनही होऊ शकेल.
 
***
ओळ ७०:
'पेड एडिटोरियल' इतका नसला तरी जाहिरातींमध्ये होऊ घातलेली विविधांगी 'इनोव्हेशन्स' हाही एक विवादास्पद भाग. इनोव्हेटिव्ह जाहिरातींचा सुळसुळाट झालेला सध्या दिसत आहे. जाहिरात 'ओव्हरलुक' होण्याचे प्रमाण कमी कसे करता येईल, अन येनकेनप्रकारेण लोकांच्या नजरेस कसे पडता येईल यासाठी आघाडीच्या उत्पादनांची, ब्रॅड्सची कसरत नेहेमी चालू असते. डोके लढवून क्रिएटिव्ह अ‍ॅड्स करायच्या अन भुवया उंचावल्या जातील, अशी पोझिशन पटकावून लोकांपूढे जायचा हा सोस. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी केले की हमखास लक्ष वेधले जाणारच, हा मुळ मंत्र!
 
इनोव्हेटिव्ह अ‍ॅड्स साठी 'प्रिंट मीडिया' सर्वांत उत्तम. जाहिराती सुरू झाल्या की रेडिओ / टिव्हीचे चॅनल्स आपण बदलतो. (यावर कडी करून कार्यक्रमात किंवा निवेदनातच जाहिराती करण्याची आयडिया आहेच!) पण वर्तमानपत्रात बातम्यांच्या नेहेमीच्या जागी जाहिरात असेल, तर तुम्ही काय करणार? नाईलाजाने का होईना लक्ष जाणारच. इथेच या जाहिरातीचा हेतु साध्य होतो. 'कॉलर पोझिशन' हा एक प्रकार. वर्तमानपत्राच्या नावाभोवती इंग्रजी 'यू' आकाराची जाहिरात. मग त्याखाली मथळे, बातम्या वगैरे. याजागी बातमी पाहायची सवय झालेला वाचक स्तिमित होतो. पण तसे का होईना, जाहिरात बघतोच! काहींना हे आवडते, काहींना नाही. कोणत्याही नियतकालिकाचे दर्शनी, पहिले पान हे त्यांचे धोरण, संस्कृती, इतिहास अन इतर बरेच काय काय दर्शविणारे असते. अन त्यामुळेच त्या त्या नियतकालिकाची विशिष्ट प्रतिमा वाचकांच्या मनात पक्की झालेली असते. जास्तीत जास्त पाव पानभर, तेही खाली, जाहिरातीसाठी जागा देणारे पहिले पान अशा अर्ध्याच्या वर जाहिरातीनेच भरून गेलेले पाहून जुने वाचक नाराज होतात. त्यामुळे तारतम्य बाळगून फ्रंट पेजवर जाहिरातीला जागा देणारी अजूनही अनेक वृत्तपत्रे आहेत. पण वरची २० ते २५% जाग व्यापणाऱ्या कॉलर अ‍ॅड्सना आता वाचकही फारसा आक्षेप घेत नाहीत. उलट हे काय नवीन, म्हणून उत्सूकतेने पुन्हा पुन्हा बघणारेही आहेत. अशा अ‍ॅड्सच्या भरघोस रीडरशिपमुळे त्यांचा दरही नेहेमीपेक्षा दुप्पट, अडीचपट, किंवा तीनपट असतो. मोठे ब्रँड्सब्रॅंड्स तो देतातही.
 
'जाहिरात पुरस्कृत' पुरवण्या काढणे हे तर नेहेमीचेच. म्हणजे वरती बारीक अक्षरांत 'टाईम्स स्पेस मार्केटिंग इनिशिएटिव्ह' असे लिहायचे अन नंतर चार सहा पाने भरभरून जाहिरात!
ओळ ७८:
जाहिरातींच्या साईझचा हिशेब करताना सें.मी. मधली रुंदी गुणिले सें.मी. मधली उंची गुणिले प्रति सें.मी. चा जाहिरातीचा दर अशी होते. पण रुंदी गुणिले उंचीच का? म्हणजे फक्त चौरसाकृती, किंवा आयताकृतीच जाहिराती का? त्रिकोणी, गोल, समलंब चौकोन अन इतर अनंत आकार आहेत की! ते संपले; तर पाण्याचे थेंब, हवेचे बुडबुडे, उडणारे केस, व्हायोलिन अन इतर अनंत आकारातही का जाहिरात का केली जाऊ नये..? तर केली जाते. अन या पाहिजे त्या आकाराच्या आऊटलाईनला खेटूनच बातम्याही बसविल्या जातात. काय बिशाद, जाहिरात 'ओव्हरलूक' होण्याची!
 
आताच टाईम्सच्या फ्रंट पेजला एक हृतिक रोशन मॉडेल असलेली जाहिरात बघितली. जाहिरातीतल्या टेक्स्टला, बॉडीला जे रंग वापरण्यात आले होते, तेच रंग त्या पानावरल्या सर्व बातम्या-मथळे इ. ना वापरण्यात आले होते. या बातम्यांत सिब्बलांच्या अर्थसंकल्पासून कसाबच्या कॉमेंटपर्यंत, अन पावसाच्या अंदाजापासून ओबामांच्या फोटोपर्यंत सारे काही होते. मथळे अन फोटो यांचे बॉक्सेस करताना जाहिरातीतलेच रंग दिसतील याची अप्रतिम काळजी घेण्यात आली होती. बराच वेळ निरीक्षण करून मी सहज ते पान अक्षरे वाचता येणार नाहीत इतक्या दुर धरले, तेव्हा मला फक्त त्या ब्रँडचेब्रॅंडचे नाव, मॉडेल अन पूर्ण पानभर एक किंवा दोनच विशिष्ठ रंगांची उधळण असे चित्र दिसले. विचार करा.. त्या ब्रँडबद्दलब्रॅंडबद्दल नंतर दिवसभर विचार करीत असाल, हे त्या जाहिरातीचे यश आहे!!
<references/>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जाहिरात" पासून हुडकले