"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎रचना: दोन मथळ्यांचा समावेश केला
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते. स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेसदृश (होमोलॉग) असणाऱ्या जनुकामध्ये चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारीरिक हालचाल नियंत्रित करणे हे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या विस्कळीत जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परीघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास.
 
स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणिसृष्टीबाहेरील सजीवांमध्ये सुद्धा पेशीपेशींमध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यांमध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कँब्रियनकॅंब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली.
 
== रचना ==
ओळ ५१:
'''द्विपार्श्व्सममित चेतासंस्था :'''
 
सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कँब्रियनकॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात.
 
सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणाऱ्या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात.
ओळ ८४:
चेतापेशी अक्षरश: शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक ॲ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठरावीक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते.
डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे.
अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्त्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लाँग“लॉंग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत.