"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]]सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.
 
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एअरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[जुआरी नदी|जुआरी]] व [[मांडवी नदी|मांडवी]] या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग ([[चोगॅम]]) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणार्‍या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत [[जर्मनी]]ची [[काँडोरकॉंडोर एअरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणार्‍या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणार्‍या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.
 
== आर्थिक व्यवस्थापन ==
दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह{{मराठी शब्द सुचवा}} आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी<sup>२</sup> क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.<ref>Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)</ref>
 
दाभोळी विमानतळावरुन रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः [[नाताळ]] व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून [[दिल्ली]] किंवा [[मुंबई]]ची तिकिटे मुंबई-[[दुबई]] किंवा मुंबई-[[बँगकॉकबॅंगकॉक]]च्या तिकिटांच्या पातळीची असतात.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=150220 Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. [[Financial Express]].]</ref>
 
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरुन धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
|[[आर इटली पोलास्का]]|वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २
|[[आर्कफ्लाय]]|ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २
|[[काँडोरकॉंडोर फ्लुगडियेन्स्ट|काँडोरकॉंडोर]]|[[फ्रांकफुर्ट आम मेन विमानतळ|फ्रांकफुर्ट]] | २
|[[एडेलवाइस एर]]| [[झुरिक]] (चार्टर सेवा) | २
|[[गोएर]]|[[दिल्ली]], [[मुंबई]]| १
|[[किंगफिशर एरलाइन्स]]| बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[इंदूर]], [[कोलकाता]], मुंबई, [[नागपूर]], [[पुणे]], [[श्रीनगर]] | १
|[[एमडीएलआर एरलाइन्स]]|दिल्ली | १
|[[मोनार्क एरलाइन्स]]| [[लंडन गॅटविक विमानतळ|लंडन-गॅटविक]], [[मँचेस्टरमॅंचेस्टर]] (चार्टर सेवा) | २
|[[नोव्हएअर]]| [[ग्योटेबोर्ग-लँडव्हेटरलॅंडव्हेटर विमानतळ|ग्योटेबोर्ग]], [[ऑस्लो-गार्डेरमोएन विमानतळ|ऑस्लो]], [[स्टॉकहोम-आर्लांडा विमानतळ|स्टॉकहोम]] | २
|[[पॅरामाउंट एरवेझ]]| चेन्नई, [[कोची]], [[तिरुवअनंतपुरम]] | १
|[[कतार एअरवेज]] | [[दोहा]] | २
|[[स्पाईसजेट]]| अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[जयपूर]], कोलकाता, मुंबई | १
|{{nowrap|[[थॉमस कूक एअरलाइन्स]]}}|लंडन-गॅटविक, मँचेस्टरमॅंचेस्टर (चार्टर सेवा) | २
|[[थॉमसन एअरवेज]]| [[ईस्ट मिडलँड्समिडलॅंड्स विमानतळ|ईस्ट मिडलँड्समिडलॅंड्स]], लंडन-गॅटविक, मँचेस्टरमॅंचेस्टर (चार्टर सेवा)| २
|[[ट्रांसएरो]]| [[मॉस्को-दोमोदेदोवो विमानतळ|मॉस्को-दोमोदेदोवो]] | २
}}
दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या [[कोइंबतूर]] जवळील [[सुलूर]] येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली [[बी.ए.ई. सी हॅरियर]] प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. [[आय.एन.एस. विक्रमादित्य]] या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ [[मिग-२९के]] विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1050070.cms India to receive MiG-29 from Russia in 2007]. [[The Times of India]]. 13 March 2006</ref> कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.
 
याशिवाय भारतीय आरमाराची [[कामोव्ह केए-२८]] प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, [[इल्युशिन आयएल-१८|आयएल-१८]], [[इल्युशिन आयएल-३८|आयएल-३८]] आणि [[तुपोलेव्ह टीयू-१४२एम|टीयू-१४२एम]] प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बाँबफेकीबॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाभोळीस ठेवतात. ही विमाने किनार्‍याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनार्‍यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची [[किरण (विमान)|किरण]] ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाभोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाभोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
 
==माल वाहतूक==
६३,६६५

संपादने