"गोंदिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३९:
 
==इतिहास==
राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे.{{संदर्भ हवा}} त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲँडॲॅंड बेरारमध्ये येत होते. त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे.
 
येथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते.
 
पूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली. त्यावेळची प्राथमिक शाळा रेलटोली (वर्ष १९१६) आणि अँग्लोॲंग्लो व्हर्नाकुलर मिडल स्कूल म्हणजेच आजचे मनोहर म्युन्सिपल हायस्कूल (१९१८) सुरू झाले. परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.
 
गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.
ओळ ५२:
गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२०मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १०असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४०वर पोहोचली आहे.
 
१ एप्रिल १९२०मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सेठ रामप्रताप लक्ष्मण अग्रवाल यांना मिळाला, तर पहिले मुख्याधिकारी म्हणून जी.व्ही. काने यांनी काम पाहिले. गोंदिया शहराची तेव्हा लोकसंख्या केवळ २०हजार होती. मात्र आज शहराची लोकसंख्या १ लाख २०हजार ६३२ वर पोहोचली आहे. आधी नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या २०हजार असल्याने तेव्हा न.प. मधील नगरसेवकांची संख्या १०होती. यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली. त्यामुळे सन २0११ मध्ये नगरसेवकांची संख्या ४०वर पोहोचली असून आधीच्या ४०वॉर्डांचे रूपांतर आता नवीन प्रभाग पद्धतीत याचे १०प्रभागांत विभाजन झाले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १८ स्क्वेअर कि.मी.आहे. सन १९४९ मध्ये शहराचा विस्तार सी.पी. अँन्डॲंन्ड बेरारअंतर्गत करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर शहराचा विस्तार करण्यात आला नाही.
 
नगर परिषदेत आतापर्यंत २०नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.सध्याचे नगराध्यक्ष श्री अशोक इंगळे हे आहेत जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले. अर्थात शहरातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंदिया" पासून हुडकले