"क्लोद मोने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
 
== जीवन ==
[[पॅरिस|पॅरिसमध्ये]] जन्म झालेल्या मोनेचे बालपण 'ल आव्र (Le Havre) ' या [[नोर्मांडी|नोर्मांडीतील]] बंदराच्या गावी गेले. मोनेचे वडील पेशाने वाणी होते; तर आई गायिका होती. बालपणी वडिलांच्या दुकानात येणाऱ्या गिर्‍हाईकांची, ओळखीतल्या लोकांची रेखाटने काढणाऱ्या मोनेला सुदैवाने [[युजेन बूदँबूदॅं]] याचे मार्गदर्शन लाभले. आपल्या मुलाने आपला घरचा धंदा सांभाळावा अशी मोनेच्या वडिलांची इच्छा होती; परंतु बुदँच्याबुदॅंच्या प्रयत्नांमुळे क्लोद मोनेला कलाशिक्षणाकरता अखेरीस पॅरीसला पाठविण्यात आले.
 
जून [[इ.स. १८६१|१८६१]] मध्ये क्लोद मोने [[अल्जीरिया|अल्जीरियातील]] फ्रेंच लष्कराच्या 'आफ्रिकन लाईट कॅव्हॅलरी'च्या पहिल्या रेजिमेंटमध्ये दाखल झाला. परंतु काही काळानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे लष्करी सेवेला रामराम ठोकून, तो पुन्हा पॅरीसमध्ये परतून 'आतलिए ग्लेएर' या शिक्षणसंस्थेत दाखल झाला. तेथे त्याचा [[पिएर रन्वार]], [[फ्रेडेरिक बाझीय|फ्रेडरिक बाझीय]], [[आल्फ्रेड सिस्ले]] या त्याच्यासारख्याच प्रयोगशील चित्रकारांबरोबर संबंध आला. खुल्या हवेत चित्रण करण्याच्या कल्पनांची, तुकड्या-तुकड्यांत जलदगतीने दिलेल्या ब्रशाच्या फटकाऱ्यांतून साकारलेल्या रंगलेपनातून ऊन-सावल्यांचा परिणाम साधण्यासारख्या प्रयोगांची त्यांच्यात देवाणघेवाण होत असे; ज्यातून पुढच्या काळातील 'दृक् प्रत्ययवाद चित्रशैली'ची बीजे पेरली गेली.
ओळ ३३:
[[चित्र:Claude Monet, Impression, soleil levant, 1872.jpg|thumb|left|275px|''[[Impression, Sunrise]] (Impression, soleil levant)'' ([[इ.स. १८७२|१८७२]]/[[इ.स. १८७३|१८७३]]).]]
 
[[इ.स. १८७०|१८७०]]-[[इ.स. १८७१|१८७१]] दरम्यानच्या काळात फ्रँकोफ्रॅंको-प्रशियन युद्धामुळे मोनेने काही काळ इंग्लंडमध्ये आश्रय घेतला होता. [[इ.स. १८७०|१८७०]] मध्येच मोनेने [[कामीय दोन्सियो]] (Camille Doncieux) हिच्याशी लग्न केले. फ्रान्समध्ये परतल्यावर 'ल आव्र' येथील निसर्गदृश्याचे चित्रण करणारे 'Impression, Sunrise' हे पुढे जाऊन दृक् प्रत्ययवाद चित्रशैलीची ओळख बनलेले चित्र चितारले.<br />
[[इ.स. १८७९|१८७९]] मध्ये कामीय दोन्सियो-मोनेचे क्षयाने निधन झाले. क्लोद आणि कामीय मोने यांना ज्याँज्यॉं आणि मिशेल असे दोन पुत्र होते.
 
[[इ.स. १८८३|१८८३]] मध्ये मोनेने [[गिवर्नी]], [[ओट नोर्मांडी]] येथे बागबगीचा फुलवलेले घर घेतले आणि [[आलिस ओशडे]] (Alice Hoschedé) हिच्याबरोबर तेथे मुक्काम हलवला. याच घराभोवती फुलवलेल्या आपल्या बगीच्यात मोनेने उर्वरित आयुष्यात बरीचशी चित्रे चितारली.<br />
[[इ.स. १८८३|१८८३]]-[[इ.स. १९०८|१९०८]] दरम्यान मोनेने भूमध्य सागरी भागामध्ये भ्रमंती केली. या प्रवासात त्याने प्रसिद्ध वास्तुशिल्पे, निसर्गदृश्ये, समुद्रकिनाऱ्यावरील दृश्ये चित्रित केली.<br />
[[इ.स. १९११|१९११]] मध्ये त्याच्या पत्नीचे - आलिसचे आणि [[इ.स. १९१४|१९१४]] मध्ये ज्याँज्यॉं या त्याच्या मुलाचे निधन झाले. उतारवयात मोनेच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला; ज्यावर [[इ.स. १९२३|१९२३]] मध्ये दोन शस्त्रक्रियादेखील झाल्या.<br />
[[डिसेंबर ५]], [[इ.स. १९२६|१९२६]] रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मोनेचे निधन झाले. गिवर्नीमधील चर्चच्या दफनभूमीत मोनेचे दफन करण्यात आले.
 
ओळ ५१:
<gallery>
चित्र:Monet Umbrella.JPG|छत्री घेतलेली बाई (१८७५)
चित्र:Claude Monet - 1867 - Garden at Sainte-Adresse.jpg|साँतसॉंत आद्रेस येथील बाग (१८६७)
चित्र:Claude Monet - Branch of the Seine near Giverny.JPG|सीन नदीचा एक प्रवाह, गिवर्नी (१८९७)
चित्र:Claude Monet 024.jpg|उद्यान विहार करणाऱ्या बायका (१८६६-६७)
ओळ ६७:
चित्र:Claude Monet - Rouen Cathedral, Facade (Sunset).JPG|सूर्यास्तसमयी रूआं कॅथेड्रल (१८९२-९४)
चित्र:Claude Monet - Rouen Cathedral, Facade I.jpg|रूआं कॅथेड्रल (१८९२-९४)
चित्र:Claude Monet 043.jpg|राष्ट्रीय दिनी साँसॉं-दनी येथील रस्त्याचे दृश्य (१९७८)
चित्र:Claude Monet Water Lilies Toledo.jpg|वॉटरलिली (१९१४-१७)
चित्र:Monet Water Lilies 1916.jpg|वॉटरलिली (१९१६)