"कृत्रिम बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास '''कृत्रिम बुद्धिमत्ता''' (Artificial Intelligence, A.I.) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही [[:वर्ग:संगणकशास्त्र|संगणक शास्त्रातील]] एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये [[यंत्र शिक्षण]] (machine learning), त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणादाखल नियोजन (planning), संयोजन (joining), निदान-विषयक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असणा‍ऱ्या प्रणाली, या [[अर्थशास्त्र]], आरोग्य [[विज्ञान]], [[अभियांत्रिकी]], [[संरक्षण]], काँप्युटरकॉंप्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यांमध्ये वापरल्या जातात.
 
== कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रवाह ==
ओळ २६:
 
== कृत्रिम बुद्धिमत्तेचे औद्योगिक उपयोग ==
बँकेमध्येबॅंकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो. ऑगस्ट २००१ मध्ये यंत्रमानवाने मनुष्याला एका खरेदी-विक्री विषयक कृत्रिम स्पर्धेमध्ये हरवले होते. रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली या बिछान्यांचे वेळापत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामांकरिता वापरात आहेत.
 
== बाह्य दुवे ==