"कूर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
[[चित्र:Hypertrophic Zone of Epiphyseal Plate.jpg|इवलेसे|[[सुक्ष्मदर्शक|सुक्ष्मदर्शकातून]] दिसणारी कूर्चा]]
कूर्चा ही दोन हाडांच्या किंवा [[सांधे|सांध्यांच्या]] मध्ये असलेली एक गादी ([[ऊती]]) होय. याला कास्थी असेही म्हणतात. ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी [[संयोजी ऊती]] आहे. हे भाग अत्यंत मऊ अशा रेषामय आवरणाने बनलेले असतात. [[कान]] व [[नाक]] यांचा काही भाग कूर्चेचा बनलेला असतो. या कूर्चा सांध्यांना सोयीस्कर बनवण्यासाठी हलविण्यासाठी मदत करते. ही [[हाडे|हाडांचे]] रक्षण करते. ही बहुदा [[चेतारज्जू]] यांना जोडलेली असते. [[गुडघा]] याच्या वाटीवरील कूर्चा झिजल्यास अतिशय त्रास होतो. तसेच मानेतील कूर्चा झिजल्यास [[स्पाँडिलायटिसस्पॉंडिलायटिस]] नावाचा विकार होतो. कूर्चेचे नुकसान झाल्यास हाडे एकमेकांवर घासून [[संधिवात|संधिवाताचा]] त्रास होतो. त्यांची झीज भरून येण्यासाठी [[प्रथिने]] आवश्यक असतात. यांची झीज अतिशय हळू भरून येते. म्हणून यांच्याशी संबंधित विकार दीर्घ असतात. [[कूर्चा रोपण]] करता येते परंतु हे अतिशय जटील क्रिया आहे. कूर्चा ही घनरूप गर्भ वाढत असताना मेझोडर्मपासून निर्मित संयोजक पेशीजाल मेदयुक्त पासून स्थापना करण्याची प्रक्रिया आहे.
कुर्चांमध्ये [[रक्त]]प्रवाह [[त्वचा|त्वचेच्या]] मानाने थोडा कमी असल्यानं किंवा नसल्याने हे भाग [[थंडी]]मुळे लगेच गार पडतात. म्हणून आपले कान व नाक गार पडते. कूर्चा [[क्ष किरण]] शोषत नाहीत.
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/कूर्चा" पासून हुडकले