"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎पुणे आश्रम : १९७४-१९८१: दुवा शोधला ~~~~
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
 
===="सेक्स गुरू"====
अठ्ठावीस ऑगस्ट १९६८ मध्ये मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात 'प्रेम' या विषयावरील पाच व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले व्याख्यान ओशोंनी दिले. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले. लोकांमधून या मतावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी व्याख्यानमाला रद्द केली. बरोबर एका महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टॅँकटॅॅंक मैदानावर प्रचंड श्रोतृसमुदायासमोर ओशोंनी व्याख्याने देऊन मालिका पूर्ण केली.<ref>ओशोकम्यून http://www.oshocommune.org/bombay-years-1968-1974.html</ref> नंतर ''संभोगातून समाधीकडे'' या नावाने प्रकाशित झालेल्या या व्याख्यानमालेमुळे भारतीय माध्यमांनी ओशोंना "सेक्स गुरू" अशी उपाधी दिली.
 
सन १९६९ मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी धर्मगुरूंवर स्वार्थीपणाचा आरोप केला आणि '[[धर्म]] म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे' असे मत मांडले. त्यांच्या भाषणादरम्यान संतप्त झालेल्या पुरीच्या शंकराचार्यांनी भाषण थांबविण्याचा असफल प्रयत्न केला.
ओळ ३९:
ओशोंचे शिष्य अर्थात्‌ नवसंन्यासी होणे याचा अर्थ नवे नाव स्वीकारणे, विरागी हिंदू साधूंप्रमाणे नारिंगी वस्त्रे परिधान करणे असा होता. वैराग्यापेक्षा उत्सवपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास या नवसंन्यासींना प्रोत्साहन दिले जाई. स्वतः संन्याशाची पूजा होणे अभिप्रेत नव्हते, तर "फुलाला उमलण्यास उत्तेजन देणारा सूर्य" अशी भूमिका त्याने बजवावयाची होती.
 
इथवरच्या काळात ओशोंच्या सचिव म्हणून कार्य करणाऱ्या लक्ष्मी ठाकरसी कुरुवा त्यांच्या पहिल्या शिष्या ठरल्या आणि त्यांनी मा योग लक्ष्मी हे नाव घेतले. लक्ष्मींचे वडील धनवान होते आणि ओशोंचे अनुयायी होते. लक्ष्मींनीच पैसे उभे करून ओशोंचे प्रवास थांबविले. डिसेंबर १९७० मध्ये ओशो मुंबईतील वुडलँड्सवुडलॅंड्स अपार्टमेंटमध्ये निवासास गेले आणि व्याख्याने देत अभ्यागतांना भेटू लागले. इथेच त्यांना प्रथम पाश्चात्त्य श्रोते लाभले. यानंतर ओशोंचा प्रवास आणि सार्वजनिक सभांमधील व्याख्याने जवळजवळ बंद झाली. सन १९७१ मध्ये त्यांनी "भगवान श्री रजनीश" ही उपाधी स्वीकारली. "श्री" हा सन्मानसूचक शब्द आहे तर भारतीय परंपरेमध्ये ज्या व्यक्तीमधील देवत्व लपून राहिलेले नाही, स्पष्ट दिसू लागलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे "भगवान" ठरते.
[[चित्र:Osho 1972 Birthday seek-index 268 0.26.ogv ‎|इवलेसे|डावे|मुंबई निवासस्थानी ओशोंचा वाढदिवस : ११ डिसेंबर १९७२ ]]
 
ओळ ५८:
इ.स. १९८१ मध्ये पूना आश्रम त्याच्या कार्यविधींमुळे संशयास्पद झाला होता. भारतीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आश्रम अमेरिकेला हलविण्याचा विचार पुढे आला. जून १९८१ मध्ये वैद्यकीय हेतू दाखवीत ओशो पर्यटकाच्या प्रवेशपत्रावर अमेरिकेत दाखल झाले. न्यू जर्सीमधील रजनीशी रिट्रीट सेंटरमध्ये (नवसंन्यासींना रजनीशी अशीही संज्ञा आहे) काही महिने ते राहिले. सन १९८१ च्या वसंतात ओशोंना चक्रभ्रंश (पाठीच्या कण्याचा एक आजार) झाल्याचे निदान करण्यात आले होते. अनेक नामांकित डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परिस्थिती कथितरीत्या गंभीर असूनही कोणताही बाह्य उपचार करवून घेण्याचा प्रयत्न या काळात ओशोंनी केला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या आप्रवास व नैसर्गीकरण सेवेला याच देशात राहण्याचा ओशोंचा हेतू आहे, अशी शंका आली. नंतर ओशोंनी आपल्या प्रारंभीच्या प्रवेशपत्र अर्जावर खोटी विधाने केल्याची कबुली दिली.
 
जून १९८१ मध्येच मा शीलाचे पती स्वामी प्रेम चिन्मय यांनी ऑरेगाॅन राज्यात एक रँचरॅंच (मुख्यत: कुरण म्हणून वापरले जाणारे विस्तीर्ण क्षेत्र) विकत घेतले. त्याचे "रँचोरॅंचो रजनीश" असे नामकरण झाले आणि ऑगस्ट अखेरीस ओशो तिथे निवासास आले. वर्षभरातच या जमिनीच्या वापरावरून कायदेशीर खटले सुरू झाले. स्थानिक रहिवाशांशीही या कम्यूनचे संबंध सलोख्याचे नव्हते. रजनीशपूरम या नावाने शहराला अधिकृत मान्यता मिळावी अशा रजनिशींचा मानसही प्रत्यक्षात आला नाही. या घडामोडींदरम्यान नोव्हेंबर १९८४ पर्यंत हे सार्वजनिक मौन टिकले. या काळात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या शिष्यांना ओशो कारमधून दर्शन देत. तब्बल ९३ रोल्स-रॉयस त्यांच्याकडे जमा झाल्या. सन १९८३ मध्ये ओशो फक्त आपल्याशीच बोलतील अशी घोषणा शीलाने केली. अनेक संन्याशांच्या मनात शीला ही ओशोंची अधिकृत प्रतिनिधी असण्याबद्दल संदेह निर्माण झाला. या काळात शीलाच्या नेतृत्वाचा निषेध म्हणून अनेक संन्याशांनी आश्रम सोडला.
[[चित्र:Osho Drive By.jpg|इवलेसे|उजवे|300px|१९८२ च्या सुमारास रजनीशपूरममध्ये एका दैनिक फेरीदरम्यान ओशोंचे स्वागत करणारे नवंसन्यासी ]]
 
ओळ ७३:
 
====खटला====
तेवीस ऑक्टोबर १९८५ रोजी अमेरिकेच्या संघ न्यायालयाने ओशो व त्यांच्या काही शिष्यांवर आप्रवासाचे नियम टाळण्याचा कट रचल्याबद्दल कायदेशीर आरोप लावला. अधिपत्र निघण्याची वेळ आल्यास पोर्टलँडमधीलपोर्टलॅंडमधील प्राधिकाऱ्यांसमोर ओशोंना शरण जाण्याची परवानगी मागणाऱ्या ओशोंच्या वकिलांच्या वाटाघाटी फिसकटल्या. अठ्ठावीस ऑक्टोबरला नॉर्थ कॅरोलिना धावपट्टीवरील एका भाड्याच्या विमानात ओशो व काही संन्याशांना अटक करण्यात आले. खटला टाळण्यासाठी हा गट बर्म्युडाकडे निघाला होता, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. जाहीर दोषारोपणानंतर आपण निर्दोष असल्याचे ओशोंनी प्रारंभी सांगितले. नंतर मात्र जामीन मिळाल्यानंतर वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी काही आरोप कबूल केले. मूळ प्रवेशपत्राच्या अर्जात अमेरिकेत कायम राहण्याचा हेतू आपण उघड केला नव्हता हे त्यांनी कबूल केले. या खटल्याच्या सोडवणुकीसाठी झालेल्या तडजोडीनुसार ओशोंनी अमेरिका सोडून जावे आणि किमान पाच वर्षे अमेरिकेच्या महाधिवक्त्याच्या परवानगीशिवाय परत येऊ नये असे सुनावण्यात आले.
 
===जगभ्रमंती आणि पुण्यात पुनरागमन : १९८५-१९९०===
ओळ ९०:
[[जैन धर्म]], [[हिंदू धर्म]], हसिदी मत, [[तंत्र]] मार्ग, [[ताओ]] मत, [[ख्रिश्चन धर्म]], [[बौद्ध धर्म]] अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर; विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू [[अद्वैत]] सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे.
 
अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन [[सिग्मंड फ्राईड]] आणि [[गुर्जेफ]] यांच्यासारखे आहे. पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणार्‍या "नवमानवा"ची त्यांची कल्पना नित्शेच्या ''बियाँडबियॉंड गुड अन्ड ईव्हिल''ची आठवण जागवते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेन्ससशी तुलना करण्याजोगे आहेत तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे.
 
===अहंकार आणि मन===
ओळ १२८:
* ''नो वॉटर, नो मून''
* ''रिटर्निंग टू द सोर्स''
* ''अँडॲंड द फ्लॉवर्स शॉवर्ड''
* ''द ग्रास ग्रोज बाय इटसेल्फ''
* ''निर्वाणा : द लास्ट नाईटमेअर''
* ''द सर्च''
* ''डँगडॅंग डँगडॅंग डोको डँगडॅंग''
* ''एन्शंट म्युझिक इन द पाईन्स''
* ''अ सडन क्लॅश ऑफ थंडर''
ओळ १५४:
* ''द हिडन हार्मनी''
'''कबीरावर'''
* ''एक्स्टसी : द फरगॉटन लँग्विजलॅंग्विज''
* ''द डिवाईन मेलडी''
* ''द पाथ ऑफ लव्ह''
'''तंत्रावर'''
* ''तंत्रा : द सुप्रीम अंडरस्टँडिंगअंडरस्टॅंडिंग''
* ''द तंत्रा व्हिजन''
'''पतंजली व योगावर'''
* ''योगा : दी अल्फा अँडॲंड दी ओमेगा''
'''ध्यानावर'''
* ''द बुक ऑफ सिक्रेट्स''
* ''मेडिटेशन : दी आर्ट ऑफ इनर एक्स्टसी''
* ''दी ऑरेंज बुक''
* ''मेडिटेशन : द फर्स्ट अँडॲंड लास्ट फ्रीडम''
* ''लर्निंग टू सायलेंस द माइन्ड''
* ''आय अ‍ॅम द गेट''
* ''द वे ऑफ द व्हाईट क्लाऊड्स''
* ''द सायलेंट एक्स्प्लोजन''
* ''डायमेंशंस बियाँडबियॉंड द नोन''
* ''रूट्स अँडॲंड विंग्ज''
* ''द रिबेल''
'''दर्शन मुलाखती'''
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले