"एशियाटिक सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्रे भर
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
==संस्था==
मुळात ही संस्था परळला गव्हर्नरच्या बंगल्यात स्थापन झाली. त्या बंगल्यात आता ‘हाफकिन इन्स्टिटय़ूट’ आहे. या बंगल्यात एकटेच राहणारे तेव्हाचे गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या उदार आश्रयाखाली, सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी २६ नोव्हेंबर १८०४ रोजी स्वतचा (लवाजम्यासोबत, विलायतेहून आणलेला) ग्रंथसंग्रह खुला करून या संस्तेला दिला. या संस्थेने १८४० सालापासून भारतीय विद्वान आणि कर्तृत्ववान माणसे जोडली. तोवर मात्र संस्थेचे सर्व सदस्य ब्रिटिश अथवा युरोपीय होते. सर माणेकजी करसेटजी हे या सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होत. [[जगन्नाथ शंकरशेट]], [[जमशेटजी जीजीभाई]] हे नगरपितेही या संस्थेचे सदस्य होते (या दोघांचे मूळ पूर्णाकृती संगमरवरी पुतळेही संस्थेतच आहेत). विल्सन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. जॉन विल्सन हे सोसायटीचे अध्यक्ष होते आणि डॉ. [[भाऊ दाजी लाड]], न्यायमूर्ती के. टी. तेलंग, सर जीवनजी मोदी, प्राच्यविद्यापंडित [[रामकृष्ण भांडारकर]], डॉ. शंकर पांडुरंग पंडित, हे विद्वज्जन संस्थेशी संबंधित होते. याच संस्थेत महामहोपाध्याय आणि भारतरत्‍न [[पां.वा. काणे]] यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा ग्रंथ सिद्ध केला. दुर्गा भागवतांनीही अनेक ग्रंथ इथे अभ्यासले. आजही २५ ‘रिसर्च डेस्क’ आहेत, तिथे संशोधकांचे काम सुरू असतेच, यापैकी दोघा संशोधकांना सोसायटीतर्फे अल्प (२५ हजार रु.) शिष्यवृत्तीही प्रदान केली जाते. शिवाय अन्य सदस्यही आपापल्या हौसेसाठी, आवडीच्या विषयांचा सखोल अभ्यास करायला अगदी वयाच्या सत्तरीनंतरही येथे येतात. उदाहरणार्थ, चित्रपट-इतिहासाचे अभ्यासक धरमशी किंवा मराठीइतकाच बंगाली साहित्याचा अभ्यास असलेले [[अशोक शहाणे]] यांसारख्या अनेकांची ज्ञानतृष्णा ‘एशियाटिक’मधल्या ग्रंथांनी, जुन्या दैनिकांसारख्या अन्य संदर्भसाहित्याने भागते. <br>
१९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी व सेंट्रल लायब्ररीचे विभाजन झाले, तेव्हा केंद सरकारने एशियाटिकला दोन कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (युटीआय) च्या बाँड्समध्येबॉंड्समध्ये गुंतवण्यात आली. युटीआय आर्थिक संकटात आल्यावर व्याजापोटी मिळणारी रक्कम आटली आणि एशियाटिक धोक्यात आली. <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=145089 'एशियाटिक'चे अश्रू]{{मृत दुवा}} [http://archive.is/FSRw विदागारातील आवृत्ती] 19 Oct 2009 07:23:44 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
 
==ग्रंथ आणि वस्तू==