"एन. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
No edit summary
छो (Pywikibot 3.0-dev)
दत्ताने बंड केले. एका रात्री तो चुपचाप घरातून पळाला आणि मुंबईत आला. आल्याआल्या त्याने बी.आर देवधर यांच्या संगीत वर्गात नाव घातले. त्यानंतर जिथून जमेल तेथून संगीताचे ज्ञान मिळवायला सुरुवात केली. फिरताफिरता एन. दत्ता हे मास्टर [[गुलाम हैदर]] यांना भेटले आणि त्यांच्या ऑर्केस्ट्रात सामील झाले. [[गुलाम हैदर]] यांचे वादनकौशल्य त्यांनी हळूहळू आत्मसात केले.
 
त्याच सुमारास दत्तांना त्यांचे चंद्रकांत भोसले भेटले. भोसले त्यावेळी [[शंकर जयकिशन]] यांच्या वाद्यवृंदात काम करीत. दत्ताही त्यांच्या गटात सामील झाले. ते गातही असत आणि वाजवतही असत. अचानक दत्तांचा संपर्क एस.डी बर्मन ([[सचिनदेव बर्मन]]) यांच्याशी आला. दत्तांचे गाणे य़कून बर्मदा खूश झाले. आणी गाण्याचे संगीतही दत्तांचेच आहॆआहे हे समजल्यावर त्यांनी दत्तांना आपले साहाय्यक म्हणून घेतले. दत्तांना समजले की ईतकी वर्षे आपण ज्या संगीताचा मागे भटकत होतो, त्या संगीत महासागराच्या काठाशी आपण पोचलो आहोत. यानंतर द्त्तांनी संगीताच्या या महासागरात डुबक्या घेऊन घेऊन आकंठ स्नान केले. पाच वर्षाच्या काळात एन. दत्ता यांनी बुझदिल (१९५१), सजा (१९५१), बाजी (१९५१), बहार (१९५१), जाल (१९५२), जीवन ज्योति (१९५३) यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी सचिनदेवांचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. बाजी आणि जालचे शीर्षक संगीत पूर्णपणॆपूर्णपणे एन. दत्तांचे होते.
 
एन. दत्तांच्या संगीतात गोव्याच्या संगीताचा बाज असलेले पाश्चिमात्य संगीत, ॲकाॅर्डियनचे मध्यम मध्यम सूर, ऑर्गन व कास्टानेट्स (लाकडी टाळां)च्या आवाजांचा मिलाफ आणि व्हायोलीनची धून यांचा मनसोक्त वापर असे.
 
संगीतकार [[सी. रामचंद्र]] आणि संगीतकार [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]]चे गुरू ॲँथनीॲॅंथनी गोनसालव्हिस हे एन. दत्तांचे चांगले मित्र होते. ॲँथनीॲॅंथनी गोनसालव्हिस यांनी एन. दत्तांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी संगीत नियोजनाचे काम केले. त्यांच्याच नावाचा उल्लेख असलेले 'अमर अकबर अँथनीॲंथनी' चित्रपटातले 'माय नेम इज अँथनीॲंथनी गोनसाल्हिस' हे गाणे रचलेले होते. ॲँथनीॲॅंथनी गोनसालव्हिस यांच्या खेरीज एन. दत्तांना त्यांचे गोवेकर मित्र [[चिक चाॅकलेट]], जो गोम्स व जाॅन गोम्स, फ्रँकफ्रॅंक फर्नांड, सबॅस्टियन आणि दत्ताराम यांनी संगीतसृष्टीत स्थिरावण्यास मदत केली.
 
==एन. दत्तांचे संगीत असलेले दिलेले हिंदी/मराठी चित्रपट==
* एक मासूम (१९६९)
* गोपाल कृष्ण (१९६५) : प्रमुख भूमिका - [[जयश्री गडकर]]
* चाँदचॉंद की दीवार (१९६४)
* चेहरे पे चेहरा (१९८१)
* जवान मर्द (१९६६)
 
==एन. दत्ता यांचे संगीत असलेली काही प्रसिद्ध चित्रपट गीते आणि त्यांचे चित्रपट==
* अश्को ने जो पाया है, वो गीतों ने दिया है (चाँदीचॉंदी की दीवार १९६४, गायक - [[तलत मेहमूद]])
* इन उजले महलों के तले, हम गंदी गलियों मे पले (भाई बहेन १९५९, गायिका - [[आशा भोसले]], गीतकार - [[साहिर लुधियानवी]])
* चोरी-चोरी मेरे गली में आना है बुरा, (जाल १९५२, गायिका - [[लता मंगेशकर]] आणि इतर, गीतकार - [[साहिर लुधियानवी]])
* तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा (धूल का फूल १९५९, गायक - [[मोहम्मद रफी]])
* प्यार की बहार ले के, दिल की बहार ले के, आजा रे आजा परदेसिया (बहार १९५१, गायिका - [[शमशाद बेगम]], गीतकार - [[राजेंद्र कृष्ण]])
* मैं तुम्हीं से पूछती हूँहूॅं, मुझे तुमसे प्यार क्यों है (ब्लॅक कॅट १९५९, गायिका - [[लता मंगेशकर]])
* मैंने चाँदचॉंद और सितारों की तमन्ना की थी, मुझे रातों की स्याही के सिवा और कुछ न मिला (चंद्रकांता १९५६, गायक - [[मोहम्मद रफी]])
* यह रात, यह चाँदनीचॉंदनी फिर कहाँकहॉं, सुन जा दिल की दासताँदासतॉं (जाल १९५२, गायक - [[हेमंत कुमार]], गीतकार - [[साहिर लुधियानवी]])
* ये किसका लहू है कौन मरा, ऐ रहबर-ए-मुल्क़-ए-क़ौम बता (धर्मपुत्र १९६०, गायक - [[महेंद्र कपूर]])
* सैंया दिल में आना रे, आके फिर ना जाना रे, छम छमाछम छम (बहार १९५१, [[शमशाद बेगम]], गीतकार - [[राजेंद्र कृष्ण]])
६३,६६५

संपादने