"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४७:
 
== सांगीतिक कारकिर्द ==
जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वत:चीस्वतःची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच [[ठुमरी]], [[दादरा]] हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे.
 
बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे भिडे-देशपांडे यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वत:स्वतः अनेक बंदिशी रचल्या आहेत. या रचना राग रचनांजली ( २००४) या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुढच्या भागात राग रचनांजली २ मध्ये आणखी ९८ बंदिशी आहेत.
 
भिडे-देशपांडे यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलनांमध्ये आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, भुवनेश्वर, ओरिसा येथील राजा राणी महोत्सव, पुण्यातील गान सरस्वती महोत्सव यांचा समावेश आहे. त्या [[आकाशवाणी]] आणि [[दूरदर्शन|दूरदर्शनच्या]] टॉप ग्रेड गायिका आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.