"चित्रबलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
माहिती जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ९:
}}
 
'''चित्रबलाक''' किंवा '''चाम ढोक''' हा करकोचा जातीचा पक्षी असून दिसायलापाणथळ सुंदरजागी आहे.याचा हाअधिवास पक्षीअसतो. आकाराने साधारणपणे गिधाडाच्या आकाराचा असून पाणथळी जागेत आढळतो.
==वर्णन ==
सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते.
 
चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.
==आढळ्स्थान ==
 
[[भारत]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[नेपाळ]], [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
==अधिवास आणि खाद्य ==
 
दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, [[बेडूक]], [[साप]], [[गोगलगाय]] वगैरे पाण्यातील जीव खातो.
==विणीचा हंगाम ==
 
चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसर्‍याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर [[बगळा|बगळे]] आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते. मादी चित्रबलाक फिकट पांढर्‍या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ५ अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात.
 
पूर्व [[विदर्भ]]ात स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात.
==चित्रदालन ==
 
<Gallery>
 
चित्र:Mycteria leucocephala -walking-8.jpg|चित्रबलाक
File:Painted Stork (Mycteria leucocephala) landing in Uppalapadu, AP W IMG 5095.jpg|
Line ३१ ⟶ ३४:
</gallery>
 
{{संदर्भनोंदी}}
{{विस्तार}}