"काबुकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
==विस्तार व प्रगती==
‘काबुकी’च्या लोकप्रियतेमुळे पुढे पुढे गैशांनीही या कलाप्रकाराचा आश्रय घेतला व ठिकठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. परिणामतः काबुकी-नाट्यात उत्तान शृंगार, क्षुद्र विनोद व अश्लीलता यांनी थैमान घातले. त्यामुळे शासनाने त्यास हरकत घेतली आणि २३ ऑक्टोबर १६२९मध्ये ‘ओन्ना काबुकी’ म्हणजे ‘स्त्रियांच्या काबुकी’ वर कायद्याने बंदी घालण्यात आली. काबुकीमध्ये स्त्रियांनी काम करणे बंद झाल्यामुळे स्वरूपसुंदर युवक आपल्या कपाळावर लांबसडक केसांची आकर्षक झुलपे सोडून व स्त्री- वेशभूषा परिधान करून काबुकी नृत्ये-नाटके करू लागले. त्याला ‘वाकाशू काबुकी’ म्हणत, परंतु त्याच कारणाकरिता शासनाने १६३० मध्ये त्यावरही बंदी घातली. तेव्हा लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर गेलेला हा नाट्यप्रकार टिकवून ठेवण्यासाठी वृद्धांनी त्यात पुढाकर घेतला व स्त्री-पुरुषांची सोंगे घेऊन त्यांनी काबुकी टिकवून धरली. याला ‘यारो काबुकी’ म्हणत. यातील मूक अभिनय, नृत्यातील पदन्यास आणि प्रणयरम्य गूढगुंजनात्मक गीते यांमुळे त्याकाळी काबुकीने जनमनाची चांगलीच पकड घेतली होती खरी; परंतु पुढे सतराव्या शतकांत काष्ठपांंचालिकांच्याकाष्ठपांचालिकांच्या प्रयोगांचा परिणाम होऊन काबुकीला जरा उतरती कळा लागली. मग काष्ठपांचालिक नाट्याकडून कथानक व ‘नो’ नाट्याकडून रंगमंच घेऊन काबुकीने आपला नवा संसार उभा केला व तेव्हापासून आजतागायत आपले अस्तित्व व वैशिष्ट्य काबुकीने टिकवून ठेवले आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात जपानी सरकारने राजकीय प्रचारासाठी काबुकीचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. महायुद्धानंतर काही काबुकी नाटकांवर बंदीही घालण्यात आली होती. या शतकाच्या उत्तरार्धात या नाट्यप्रकारास आधुनिक वळण देण्याचा प्रयत्न होत आहे.
 
==स्वरूप==
"https://mr.wikipedia.org/wiki/काबुकी" पासून हुडकले